हिंदू जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेचे आंदोलन
लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
नगर – नगर शहरासह जिल्ह्यात वाढत असलेल्या लव्ह जिहाद घटनांच्या निषेधार्थ बुधवारी सायंकाळी हिंदू जनजागृती समिती प्रणित रणरागिणी शाखा व विविध हिंदुत्ववादी संघटनाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. चौपाटी कारंजा चौकातील वीर सावरकर यांच्या पुतळ्यासमोर हे आंदोलन झाले. जोरदार घोषणाबाजी करत यावेळी राज्यत लव्ह जिहाद विरोधी कायदा आणि धर्मांतरण बंदी कायदा तात्काल लागू करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी हिंदू जनजागृति समिती, हिंदू राष्ट्र सेना, भाजपा महिला आघाडी, सनातन संस्था, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, वंदेमातरम् प्रतिष्ठान आदी हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी भगवे झेंडे व निषेधाच्या घोषणा लिहिलेले फलक घेवून सहभागी झाले होते.
यावेळी आंदोलनाच्या संयोजिका हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेच्या समन्वयक प्रियांका कोरेगावकर म्हणाल्या, लव्ह जिहाद हे सिमी या आतंकवादी संघटनेचे षडयंत्र आहे. नगर सह जिल्ह्यात लव्ह जिहादच्या घटना दरोरज वाढत आहेत. श्रीरामपूर तालुक्यात १४ पेक्षा जास्त घटना घडल्या आहेत. चीड निर्माण करणाऱ्या या घटना आहेत. लव्ह जिहाद विरोधार सर्व हिंदूंनी एकत्र यावे. नुसते निषेधाचे आंदोलन न करता लव्ह जिहाद विरोधात हिंदू युवती व महिलांमध्ये जनजागृती आम्ही करीत आहोत.
गेल्या काही दिवसांत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हिंदू मुली पळवून त्यांचा लैंगीक छळ करण्यात आल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. या घटनांमधील आरोपी एकाच धर्मांध जातीतील आहेत. ते लव्ह जिहाद मध्ये हिंदु मुलींना प्रेमजाळ्यात फसवतात आणि नंतर त्यांचे बळजोरीने धर्मांतरण करतात. धर्मांध युवकांना 'लव्ह जिहाद' साठी प्रोत्साहन व पैसा दिला जाते. नगर जिल्ह्यात सुद्धा अशा लव्ह जिहादच्या आणि अल्पवयीन मुलींना फसवून त्यांचे अपहरण करण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. हिंदू युवतींनी आणि त्यांच्या पालकांनी वेळीच हे षडयंत्र ओळखून सावध व्हावे आणि आपली यात फसवणूक होणार नाही याची दक्षता घ्यावी. असे त्या म्हणाल्या.
रामेश्वर भूकन हे आंदोलनाची भूमिका सांगताना म्हणाले, देशात उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, छत्तीसगड, अरुणाचल प्रदेश, हिमाचल प्रदेश, गुजरात, उत्तराखंड, ओडिसा, झारखंड, कर्नाटक या १० राज्यांत धर्मांतर बंदी कायदा अस्तित्वात आहे. मात्र अद्याप महाराष्ट्रात नाही. म्हणून त्वरित हा कायदा व्हावा यासाठी ठिकठिकाणी हे आंदोलन होत आहे.
यावेळी भाजपा महिला आघाडीच्या सुरेखा विद्दे, गीता गिल्डा, गीतांजली काळे, अंजली वल्लाकटी, रेखा विधाते, वंदना पंडित, प्रिया जाणावे, मनीषा डावरे,गोरक्षनाथ तांदळे, कुणाल भंडारी, अरुण ठाणगे, संतोष गवळी आदींसह मोठ्या संख्यने हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
0 टिप्पण्या