Ticker

6/Breaking/ticker-posts

तात्या म्हणजे कसलेल , रांगड, अन् निष्ठावान नेतृत्व

 








लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)


नगर : तात्या हे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे पंधरा वर्षे संचालक होते. यापैकी एक वेळा तात्या बिनविरोध संचालक झाले होते. तर दोन वेळा निवडणूक होऊन संचालकपदी निवडून आले होते. जामखेड तालुक्यातील सहकारी संस्थांवर त्यांची निर्विवाद पकड होती. तात्या जिल्हा मजूर फेडरेशनचे काही काळ संचालक होते. देखरेख संघ, खरेदी विक्री संघ या तालुक्यातील महत्त्वाचा सहकारी संस्थांची सत्ता स्व. गोपाळराव सोले पाटील ऊर्फ दादांच्या नंतर तात्यांच्या ताब्यात अनेक वर्षांपासून आहेत. तर बाजार समितीची सत्ता अनेक वर्षे त्यांच्याकडेच होती.


सहकार महर्षी स्व. गोपाळराव सोले पाटील, बँकेचे माजी चेअरमन स्व. साहेबराव आबा पाटील , जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष स्व. बाबासाहेब पवार (भाऊ) ऊर्फ बी.एन पाटील यांच्या बरोबर तात्यांनी राजकारणाला सुरुवात केली आणि त्यांच्या नंतर सहका राच्या राजकारणात स्वतः चा दबदबा निर्माण केला. ग्रामीण भागातील लोकांना भावलेले हे रांगड नेतृत्व आज काळाच्या पडद्याआड गेल आहे.


♦ स्व. बाळासाहेब विखें पाटलांचे खंद्दे समर्थक   

तात्या हे विखे पाटील समर्थक म्हणून ओळखले जात होते. जिल्ह्याच्या राजकारणात अनेक वेळा अनेक बदल झाले. स्व. बाळासाहेब विखे पाटील यांनी जिल्हा विकास आघाडी स्वतंत्र पणे कायम अस्तित्वात ठेवली, त्यामुळे कितीही राजकीय वादळ आली तरी आपल्या निष्ठावांताना कायम राजकीय प्रवाहाबरोबर प्रवाही ठेवण्याचे कसब विखे पाटील यांनी दाखविले. त्या आघाडीचे जामखेड तालुक्याचे सुकानु तात्यांनी समर्थपणे सांभळली.  त्यामुळे  तात्यांचा सहकारी संस्थेवरील वर्चस्व कायम अबाधित राहिले. शेवट पर्यंत विखे पाटील समर्थक व अविचल निष्ठावान  म्हणून त्यांची ख्याती राहिली. तात्यांनी माजी मंत्री बाळासाहेब विखे पाटील, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील या तिन्ही पिढ्याबरोबर सहकाराचे राजकारण केले.


 काही वर्षे तात्यांनी तात्कालिन आमदार व विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांच्या सोबत सहकाराचे राजकारण केले.  मात्र पुढे या दोघांमध्ये राजकीय दुरावा निर्माण झाला आणि तात्यांनी स्वतंत्ररित्या सहकाराचे राजकारण केले. त्यांचे चिरंजीव जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुधीर राळेभात हे  आमदार रोहित दादा पवार यांच्या समवेत राजकीय वाटचाल करीत आहेत. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील तालुका विकास अधिकारी दत्तात्रय सरोदे यांचे तात्या सासरे होत. तात्यांची कारकीर्द नवीन राजकारण्यांनी अनुसरवी. तालुका एका सहकार महर्षीला मुकला आहे.  भावपुर्ण श्रद्धांजली...



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या