लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
नगर: दि.६ सप्टेम्बर २०२२
नगर अर्बन मल्टीस्टेट- शेड्युल्ड बँकेवर रिझर्व्ह बँकेने लावलेल्या दुसऱ्या निर्बंधांचे तीन महिने आज पूर्ण झाली आहेत. अर्बन बँकेबाबत रिझर्व्ह बँक काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष होते. आज सायंकाळी बँकेच्या मुख्य कार्यालयास रिझर्व्ह बँकेचे पत्र प्राप्त झाल्याची माहिती प्रभारी चेअरमन दीप्ती गांधी यांनी दिली.
रिझर्व्ह बँकेच्या नव्या आदेशत नगर अर्बन बँकेच्या कारभारास 6 डिसेंबर 22 पर्यंत मुदत वाढ
देण्यात आली आहे. या दरम्यान बँकेवरील निर्बंध मध्ये काहीही बदल केलेला नाहीये.सत्ताधारी
संचालक मंडळाने मागील नऊ महिन्यात १५ हजारावर थकबाकीदारांकडून
१८७ कोटी रुपये कर्ज वसूल केले आहेत. तसेच नुकतीच बँकेस एक रक्कमी कर्जफेड योजनेस मंजुरी मिळाली आहे.
दरम्यान रिझर्व्ह बँकेने दिलेली ही मुदतवाढ
एकप्रकारे विद्यमान संचालक मंडळास संधी मानली जात असून या संचालकानी पुढील वसूली करुन
थकीत खातेधारकांचे पैसे देण्याचा प्रयत्न करण्याची गरज आहे.
0 टिप्पण्या