Ticker

6/Breaking/ticker-posts

महाराष्ट्रातील ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थांच्या एक लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींना संरक्षण

 





महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास महाराष्ट्राचे सहकार मंत्री अतुल सावे तसेच केंद्रीय अर्थ राज्य मंत्री भागवत कराड, मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांचेसह माजी अर्थ राज्यमंत्री आनंदराव आडसूळ  आदी.


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क 

कोपरगाव- जिल्हा स्थैर्यनिधी सहकारी संघ ज्याप्रमाणे लिक़्विडीटी बेस प्रोटेक्शन फंडाच्या आधारे पतसंस्थांच्या ठेवींना संरक्षण देते, त्याप्रमाणे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या हमीद्वारे संरक्षण देणार असल्याची घोषणा महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक  विद्याधर अनास्कर यांनी केल्याची माहिती महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी दिली. 


या योजनेबाबत बोलताना  कोयटे म्हणाले कि, ‘भारतातील नागरी सहकारी बँकेची ज्याप्रमाणे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हि शिखर बँक आहे , त्याप्रमाणे महाराष्ट्रातील नागरी सहकारी पतसंस्थांची महाराष्ट्र राज्य सहकारी बँक शिखर बँक समजली जाते. त्यामुळे या ठेव संरक्षणाला अधिकृत दर्जा प्राप्त होणार आहे, तसेच सध्या ठेव संरक्षणाची रक्कम हि १ लाख रुपयांपर्यंत आहे तरीही टप्प्या टप्प्याने हि रक्कम वाढत जाणार आहे. 

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास महाराष्ट्राचे सहकार मंत्री अतुल सावे तसेच केंद्रीय अर्थ राज्य मंत्री भागवत कराड, मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांचेसह माजी अर्थ राज्यमंत्री आनंदराव आडसूळ हे उपस्थित होते.

याबाबत अधिक माहिती देतांना महाराष्ट्र राज्य फेडरेशनचे कार्याध्यक्ष राजुदास जाधव व महासचिव डॉ.शांतीलाल शिंगी म्हणाले कि, महाराष्ट्रात सहकारी पतसंस्थांचे मोठे जाळे आहे. तथापी सदर पतसंस्थांना बँकेचा बँकिंग परवाना नसल्यामुळे त्यांच्याकडे असलेल्या ठेवीदारांना संरक्षण मिळत नाही.त्यामुळे अनेक ठेवीदार पतसंस्थांकडे ठेवी ठेवण्याबाबत संभ्रमावस्थेत असतात.परंतु आता महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने १ लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींना हमी दिल्याने पतसंस्थांची विश्वासार्ह्यता वाढण्यास व पर्यायाने पतसंस्थांच्या ठेवींमध्ये वाढ होण्यास मदत होईल.

राज्य फेडरेशनचे खजिनदार दादाराव तुपकर व उपकार्याध्यक्ष सुदर्शन भालेराव  म्हणाले कि,‘गेली अनेक वर्षांपासून राज्य फेडरेशन करीत असलेली मागणी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक  विद्याधर अनास्कर यांनी मान्य केल्यामुळे आता पतसंस्थांची विश्वासार्ह्यता देखील वाढीस लागेल. त्यामुळे पतसंस्थांनी देखील आता जबाबदारीने वागण्याची गरज आहे.’

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे कार्यकारी संचालक अजित देशमुख या योजनेबाबत अधिक माहिती देतांना म्हणाले कि, ‘सहकारी पतसंस्थांनी आपल्या एक लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींची एकूण रक्कम महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत गुंतवायची आहे या ७ टक्के इतका परतावा देखील देण्यात येईल. त्यामुळे सहकारी पतसंस्थांचे कोणत्याही प्रकारे नुकसान न होता ठेवींना संरक्षण मिळणार आहे. या प्रसंगी माहिती महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे संस्थापक वसंतराव शिंदे, महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या पतसंस्थेचे संस्थापक व महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे संचालक चंद्रकांत वंजारी तसेच संचालक लक्ष्मण पाटील व सर्जेराव शिंदे हे उपस्थित होते.

अहमदनगर जिल्हा स्थैर्यनिधी सहकारी संघाचे वतीने गेली १० वर्षे हि योजना अहमदनगर जिल्ह्यात स्थैर्यनिधी सहकारी संघ यशस्वीपणे राबवित येत आहे. याच धर्तीवर आता संपूर्ण राज्यात राबविणार येणार असल्याने सहकारी पतसंस्थांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असल्याचे मत अहमदनगर जिल्हा स्थैर्यनिधी सहकारी संघाचे अध्यक्ष सुरेश वाबळे व  उपाध्यक्ष वसंत लोढा यांनी व्यक्त केले. 

या कार्यक्रमाचे प्रसंगी महाराष्ट्रातील सहकारी चळवळीचे वतीने महाराष्ट्र राज्य फेडरेशनच्या मुख्य कार्यकारी संचालक सौ. सुरेखा लवांडे यांनी आभार व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या