लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
राहुरी : राहुरी पोलिसांनी मोठी कामगिरी करीत कोट्यवधी अंमली पदार्थांसह प्रतिबंध केलेले नशा आणणारे औषधे, गर्भ नष्ट करणार्या औषधांसह उत्तेजन करणारे ड्रग्ससदृष्य पदार्थांसह कोट्यवधी रूपयांचा साठा जप्त करण्यात आला. राहुरी ते बारागाव नांदूर रस्त्यावरील शिव चिदंबरम मंगल कार्यालयालगत असलेल्या गाळ्यांमध्ये हा औषधांचा साठा लपविण्यात आला होता.
छुप्या मार्गाने औषधांची विक्री करणारे पोलिसांच्या रडारवर आले असून अनेक छोटे मोठे गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात अडकणार अशी माहिती पोलिस सुत्रांकडून समजली आहे.
राहुरी पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांना गुप्त खबर्याकडून प्रतिबंधित औषधांसह नशेचे अंमली पदार्थ विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिस निरीक्षक दराडे यांनी पो.स.ई. सज्जन नर्हेडा, महिला पो.स.ई. ज्योती डोके, पोलिस हवालदार अजिनाथ पाखरे, अशोक शिंदे, विकास साळवे, नदीम शेख, प्रविण अहिरे, दादासाहेब रोहोकले, नितीन शिरसाठ, राजेंद्र आरोळे यांसह सापळा टाकत तीन जणांना ३ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजताच ताब्यात घेतले. पोलिसांनी खाक्या दाखविताच ड्रग्ससदृष्य साठ्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानुसार राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर रस्त्यावर असलेल्या शिव चिदंबरम मंगल कार्यालय लगत असलेल्या एका पत्र्याच्या गोडाऊनमध्ये छापेमारी केली. गोडाऊनमध्ये गर्भ नष्ट करणारे औषधांसह उत्तेजनाचे पदार्थ, गुंगीचे औषधे व नशा आणणारे विविध औषधांचा मोठा साठा दिसून आला. कोटी रूपयांचा साठा सापडल्याची माहिती पसरताच नांदूर रत्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली.
पोलिसांनी अन्न औषध प्रशासनाचे पोलिस निरीक्षक डी.एम. दरंदले यांना पाचारण केले. श्रीरामपूर विभागाचे पोलिस उपअधिक्षक संदिप मिटके यांनी घटनास्थळी तात्काळ भेट देत तपासाला गती दिली.
पोलिसांना गर्भ निरोधक गोठ्या, गर्भ नष्ट करणारे औषधे, कोडीम कफ सिरप, अल्फा झिरम, व्हायग्रा गोळ्यांचा कोट्यवधी रूपयांची मोजमाप प्रक्रिया दुपारीच सुरू झाली. सायंकाळी उशिरापर्यंत पोलिस प्रशाससनासह अन्न, औषध प्रशासनाकडून औषधांची पडताळणी व मोजणी सुरू होती. याप्रसंगी अन्न, औषध प्रशासनाचे अधिकारी यांनी माहिती देताना सांगितले की, डॉक्टरांच्या चिठ्ठी शिवाय अवैधरित्या प्रतिबंधित औषधांचा बहुतेक साठा पोलिसांनी जप्त केलेला आहे. याबाबत सविस्तर चौकशी करून गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे सांगितले.
श्रीरामपूरच्या अप्पर पोलिस अधिक्षक स्वाती भोर यांनीही तात्काळ उपास्थिती देत घटनेची माहिती घेतली. राहुरी पोलिसांच्या कामगिरीमुळे केवळ राहुरीतच नव्हे जिल्ह्यातील विविध भागामध्ये अवैध व प्रतिबंधित असलेले औषध विक्री करणारे व औषधांचा साठा उपलब्ध करणार्यांचा पर्दाफाश होणार असल्याने सर्वसामान्यांमधून कारवाईचे स्वागत करण्यात आले आहे. पोलिसांनी सकाळीच तीन जणांना ताब्यात घेतले होते. त्यापैकी एकाचा गुन्ह्याशी संबंध नसल्याने त्यास सोडून देण्यात . तर दोघांसह अजून किती जणांवर कारवाई होणार याकडे वैद्यकीय क्षेत्रासह सर्वांचे लक्ष लागले आहे.
0 टिप्पण्या