लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क
शिर्डी, दि.२६
राज्याचे महसूल पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या कुटूंबिया समवेत सर्जा राजाची पारंपारिक पध्दतीने पूजा करून पोळा सणाच्या शेतकऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी खा. डॉ सुजय विखे पाटील जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालीनीताई विखे पाटील उपस्थित होते.मंत्री विखे पाटील यांनी सर्जा राजाचे पूजन केले. सौ. शालीनीताई विखे पाटील यांनी सर्जा राजाला औक्षण करून कृतज्ञता व्यक्त केली.
बैल पोळा सणाच्या राज्यातील शेतकऱ्यांना आणि जनतेला शुभेच्छा दिल्या. कृषी संस्कृतीमध्ये पशुधनाचे महत्व खूप मोठे आहे.या पशुधनाच्या संवर्धनासाठी सरकार कटीबध्द असून,बळीराजालाही दिलासा देण्यासाठी सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेवून त्याची अंमलबजावणी सुरू केली असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.
दोन वर्षाच्या कोव्हीड संकटानंतर यंदा मोठ्या उत्साहात पोळासण साजर होत आहे.नैसर्गिक संकट आणि आव्हानात्मक परिस्थितीवर मात करून यंदाचा सण साजरा होत असल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळाले.विविध गावांमध्ये पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर चांगली गर्दी दिसून आली.
0 टिप्पण्या