Ticker

6/Breaking/ticker-posts

आमदार मोनिकाताई राजळे यांना मंत्रीपदाची संधी मिळावी

 जोगेवाडी ग्रामपंचयतीमध्ये सर्वानुमते ठराव मंजुर

 








लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

पाथर्डी:-  पाथर्डी - शेवगाव विधानसभेच्या कर्तव्यदक्ष आमदार मोनिकाताई राजीव राजळे यांना आगामी मंत्रीमंडळ विस्तारात मंत्रीपदाची संधी देण्यात यावी, अशी मागणी जोगेवाडी ग्रामपंचयतीच्यावतीने करण्यात आली आहे.


अहमदनगर महापालिकेचे नगरसेवक रामदास आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या जोगेवाडी ग्रामपंचयतीसाठी आमदार मोनिका ताई राजळे यांनी भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामूळे गावात आणि परीसरात विकासाची अनेक कामे मार्गी लागले असून आणखी काही प्रगती पथावर आहेत असे अमोल आंधळे यांनी सांगीतले.


आमदार मोनिका ताई राजळे यांनी  पाथर्डी व शेवगाव तालुक्यांत देखील विकास कामांचा जोरदार धडाका सुरू ठेवला असून हे सातत्य कायम राहन्यासाठी त्यांना मंत्रीपदाची संधी मिळणे गरजेचे आहे. असे दि. २४ ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामपंचायत ठरावात म्हटले आहे.


यावेळी सरपंच मुक्ताबाई आंधळे, उपसरपंच राजेंद्र आंबिलढगे , बाळासाहेब आंधळे, अर्चना बडे, सविता बडे, दादासाहेब बडे, जयश्री बडे या सदस्यांसह  मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या