लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
श्रीरामपूर :- शहरातील अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (टाऊन शाखा) येथे सुरक्षा रक्षकाच्या बंदुकीतून सुटलेल्या गोळीत एका जणाचा जागीच मृत्यु झाल्याची घटना आज दुपारी घडली. त्यामूळे एकच खळबळ उडाली. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी सुरक्षा रक्षकाला ताब्यात घेतले आहे.
अजित जोशी (रा. वाकडी, रा. राहाता) असे गोळीबारात मृत्यु पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. दशरथ कारभारी पुजारी या सुरक्षा रक्षकाच्या बंदुकीतून ही गोळी सुटली होती. मयत जोशी हे कामासाठी बँकेत आले होते. याच वेळी बँकेत कॅश येणार असल्याने सुरक्षा रक्षक पुजारी हे आपली बंदुक लोड करीत होते.
बंदुक लोड झाल्यानंतर अचानक बंदुकीतून गोळी सुटली. सदरची गोळी अजित जोशी यांना लागल्याने त्यांचा जागीच मृत्यु झाला. घटनास्थळी पोलिस उपाधीक्षक संदीप मिटके, पोलिस निरीक्षक संजय सानप यांनी भेट दिली.
0 टिप्पण्या