Ticker

6/Breaking/ticker-posts

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तमाम जनतेला भावनिक साद

 





लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)


मुंबई : दि. २२ जून २०२२ :

 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला उद्देशून आत्ताच केलेले भाषण आरपार भिडले. डोळे पाणावले. इतका प्रांजळ आणि सरळमार्गी राजकारणी आपल्याला प्रथमच दिसतोय.


 ठाकरे यांच्याबद्दल ते मुख्यमंत्री होण्याच्या आधी अनेकांच्या मनात खूप दूषित पूर्वग्रह होते. पण ते मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी करोनाकाळात ज्या कळकळीने महाराष्ट्राचे संगोपन केले ते अतुलनीय होते. त्यांच्यासोबत अनेकांना काम करताना त्यांचे जवळून जे दर्शन झाले ते आदर वाढवणारे होते. आहे. राहील.


 अशा माणसाने मी मुख्यमंत्रीपद सोडतो, अगदी शिवसेना पक्षप्रमुखपदही सोडतो ही दाखवलेली तयारी सर्वसामान्यांच्या काळजात खोलवर भिडली. त्यांच्या मनाला स्पर्शून गेली. सत्ता येईल, जाईल, अशी गुणी माणसं जपायला हवीत. असा कुटुंबप्रमुख फार मोलाचा आहे. पर्याय देणारे नाना फडणीस कोरडे आणि कोते राजकारणी आहेत, अशा प्रकारच्या भावना सर्वसामान्य नागरिकांच्या मनात निर्माण झाल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या