लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
दि. 21 मे 2022 :
शिवसेना नेते एकनाथ शिंदें यांच्या बंडानंतर राज्यात अत्यंत नाट्यमय राजकीय घडामोडींना वेग आला असून आमदारांच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ' मी राजीनामा देतो, तुम्हीच C M व्हा..अशी ऑफर एकनाथ शिंदेंना दिल्याचे वृत्त आहे.
एकूणच एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणी सेनेच्या गोटात अस्वस्थता असून मुंबई राजकीय उलथापालथीचे केंद्र बनले आहे. सर्व पक्षांनी आप-आपले आमदारांना तत्काळ मुंबईत पाचारण होण्याचे आदेश धाडले आहेत. या राजकीय आणीबानित नेते मंडळींना तारेवरची कसरत करावी लागते आहे.
दरम्यान शिंदेंचे बंड थंड करण्यासाठी निकराचे प्रयत्न सुरू आहेत. त्यातूनच शिंदें यांनी दिलेले 3 प्रस्तावावर खल सुरू आहे. त्यांनी भाजपा समवेत सरकार स्थापन करून मला उपमुख्यमंत्री करण्याच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिंदेंना थेट मुख्यमंत्री पदाची ऑफर दिल्याचे वृत्त वाऱ्यासारखे व्हायरल झाले आहे. दरम्यान ठाकरे यांनी शिंदेंना पदावरुन दूर केल्याची माहिती देखील मिळत आहे. ठाकरे यांनी शिंदेंना C M पदाची ऑफर देऊन देवेंद्र फडणवीस यांना धोबी पचाड देउन एकच सस्पेन्स वाढविला आहे. आता शिंदे काय निर्णय घेणार याची उत्सुकता वाढली आहे.
0 टिप्पण्या