लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
मुंबई : मुंबईतील कुर्ला येथे मध्यरात्रीच्या सुमारास चार मजली इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली. त्यामुळे पुन्हा धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कुर्ल्यातील नाईक नगरमध्ये काल रात्री उशिरा ही ४ मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेत अगोदर दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र, आता या दुर्घटनेत मृतांचा आकडा हा तब्बल २० वर गेला आहे.
घटना घडली त्या मतदार संघाचे शिवसेनेचे बंडखोर आमदार मंगेश
कुडाळकर हे सध्या इतर बंडखोर आमदारांसह गुवाहाटीला आहेत. ही घटना कळताच त्यांनी
आणि बंडखोर नेते एकनाथ शिंदेंनी मृत आणि जखमींसाठी आर्थिक मदत जाहीर केली. मात्र, मतदारसंघात इतकी मोठी घटना घडली आणि तिथे जाता
येत नसल्याने आमदार मंगेश कुडाळकर यांच्या डोळ्यात पाणी आल्याची माहिती बंडखोर
नेते दीपक केसरकर यांनी दिली.
कुर्ला पूर्वेकडील एसटी बस डेपोच्या जवळील नाईक नगर
सोसायटीयेथील चार मजली इमारत सोमवारी रात्री ११. ३० च्या दरम्यान कोसळली. यावेळी
इमारतीत २० ते २५ रहिवाशी होते. ही दुर्घटना लेव्हल-३ ची असून घटनेची माहिती
मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून बचावकार्याला सुरुवात केली.
इमारत कोसळल्यानंतर ढिगाऱ्याखाली २०-२५ लोक अडकले होते. त्यापैकी २० जणांचा मृत्यू
झाल्याची माहिती आहे. सध्या बचावकार्य अद्याप सुरू आहे. दरम्यान, काल रात्री दुर्घटनेनंतर पर्यावरण
मंत्री आदित्य ठाकरे यांनी घटनास्थळी जाऊन सर्व पाहणी केली. तसेच, काल दुपारीही ते पुन्हा परिस्थितीची पाहणी करण्यासाठी गेले होते.
0 टिप्पण्या