लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
सुभाष केकाण
अहमदनगर :- सध्या राज्यभर राजकिय दृष्ट्या बहुचर्चित असलेला एकमेव विषय म्हणजे भाजपच्या फायर ब्रँड नेत्या पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची डावलण्यात आलेली उमेदवारी.. यावरून कार्कर्त्यांत जसा रोष व्यक्त केला जातोय. तसाच सर्व माध्यमांतून हाच विषय चर्चिला जातोय.. किंबहुना विषय सुद्धा तेवढाच संवेनशील असल्यामुळे मत - मतांतरे, चर्चा तर होणारच...
यानिमित्ताने भाऊ तोरसेकर यानी त्यांच्या चॅनलवर जे एकांगी मत मांडले आहे, त्याविषयी वास्तव दुसरी बाजू देखील पाहणे आवश्यक ठरते, त्या अनुषगाने... भाऊ तोरसेकर हे 50 वर्ष विविध माध्यमात कार्यरत असलेले जेष्ंठ पत्रकार, लेखक, स्तभं लेखक व राजकीय विश्लेश्क आहेत. त्यांचा प्रतीपक्ष या यु ट्यूब चॅनलवरील पंकजा मुंडेनी विनाविलंब शिवसेनेत दाखल व्हावे असा दिलेला सल्ला ऐकला . त्यांचे राजकीय विश्लेशन ऐकल्यावर एक प्रश्न मला पडला कली सल्ला भाऊ तोरसेकरांचा आहे की फडणवीसांचा ? असा प्रश्र पडल्याशिवाय राहत नाही. , मी देखील एक पत्रकार आहे. तोरसेकरांच्या निम्माच म्हणजे 25 वर्षाचा पत्रकारीतेचा अनुभव मला आहे. शिवाय सध्याचा मी भारतीय जनता पक्षाचा भगवानगडाच्या पायथ्याशी असलेल्या अकोला पंचायत समिती गणाचा सदस्य आहे.
लोकनेते गोपीनाथ मुंडेंची कन्या असलेल्या पंकजाताईंना विधान परिषद उमेदवारी मिळावी अशी पंकजा ताईंच्या चाहत्याची इच्छा होती. इच्छा असण्याचे कारण ही तसेच होते, अलिकडील काळात त्यांना *भाजपाच्या निर्णय प्रक्रीयेतून डावलले जाते. त्या मास लिडर , ओबीसीच्या नेत्या , अंत्यत धाडसी व महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून त्यांंचेकडे त्यांचा चहाता वर्ग पहातो.* असे असतांनाही निव्वळ पंकजा उद्दयाच्या राजकारणातील मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमधील फडणवीस साहेब त्यांना स्पर्धक समजत असावेत म्हणून त्यांना डावलले जाते अशी भावना पंकजा मुंडे समर्थकांची झालेली आहे. त्यातूनच त्यांचा चहाता वर्ग तसेच राज्यभर असलेले भाजपाचे पदाधिकारी, यांनी पंकजाताईंना विधान परिषद न दिल्याने समाज माध्यम, माध्यमे, यामधून नाराजी व कार्यपध्दती बाबत टिका सुरु केली. त्यातच काही अती संवेदनशिल मनाच्या कार्यकर्त्यांनी मंत्री भागवत कराड व विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांच्या वहानाचा ताफा अडवून नाराजी व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. पंकजा मुंडे भाजपाच्या नाहीत का? त्यांना का डावलता असा कार्यकर्त्यांचा सुर होता. हे सर्व करण्यामागे काही पंकजाताई मुंडेनीं समर्थकांना पाठवले नव्हते. तर हे सर्व समर्थक कार्यकर्ते पंकजा मुंडेच्या नेतृत्वावर विश्वास असलेले प्रखर भावना व्यक्त करणारे व हाळव्या मनाचे निष्ठावान कार्यकर्ते होते. त्यामुळे तेच तेच दोन कार्यकर्ते परत परत कुठेतरी धुमाकूळ करतात घोषणा देतात, मग त्याला धुमाकूळ घालने म्हणणे कल्पना दारिद्र्याच लक्षण म्हणता येणार नाही का ?असे तोरसेकरांचे विश्लेशन करणे हे चुकीचे ठरु शकते.
पंकजाताईंच्या नेतृत्वाला गोपीनाथ मुंडेचा राजकीय वारसा आहे. हे सत्य असले तरीही पकंजा मुंडेचा राजकीय संघर्ष भारतीय जनता पार्टीला नाकारुन चालनार नाही. आपल्या वडीलांच्या निधनानंतर 14 व्या दिवशी पंकजाताईंनी भगवानगडावर येवून आपल्या डोळ्यातील आश्रू आटवत त्यांनी समाजाच्या डोळ्यातील आश्रू पुसण्याचेे काम केले. गोपीनाथ मुंडेचा राजकीय वारसा पुढे घेवून जाण्याचा त्यांनी संकल्प केला. आणि संबध महाराष्ट्रात संघर्ष यात्रा काढली. ही संघर्ष यात्रा परळी मधून त्यांना आमदार होणेसाठी नव्हती. अगर त्यांना मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पडले नव्हते. मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून गोपीनाथ मुंडेनीच भगवानगडावर देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख केला होता. स्व. गोपीनाथ मुंडेच्या निधनाच्या सहानुभूतीने व पंकजा मुंडेच्या नेतृत्वामुळे राज्यात भाजपाची सत्ता आली हे नाकारता येणार नाही. जेव्हा संघर्ष यात्रा काढली त्यावेळी *कोण आली रे... कोण आली... महाराष्ट्राची वाघीण आली* ही घोषना समर्थकांनी तयार केली. *भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या नेतृत्वाकडे समर्थकांकडून पाहीले जावू लागले*. तसा उल्लेख सुरु झाला. त्यामुळेच त्यांनी एका कार्यक्रमात जनतेच्या मनातील मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केला. तो डंका नव्हता. अगर त्यांनी स्वत: मुख्यमंत्री म्हणून स्वत:ला प्रोजेक्ट देखील केले नव्हते.
राज्याच्या मंत्रीमंडळात त्यांनी प्रभावी मंत्री म्हणून काम केलेले नाकारता येणार नाही. पित्याच्या पुण्याईवर त्यांना आमदारकी मिळाली असली तरी त्या आमदारकीचे त्यांनी सोने केलेले आहे. मोठा निधी परळी मतदार संघातील प्रत्येक गावात त्यांनी दिलेला आहे. ग्रामविकासाच नवं रुप त्यांनी निर्माण केलेल आहे. शाश्वत व चिरस्थायी ग्रामविकास त्यांनी निर्माण केला. मात्र या गडबडीत *त्यांना आपला वडीलोपार्जीत मतदार संघ राखता आला नाही. अस म्हणन खर असल तरी त्यांच्या पराभवासाठी अनेकांनी देव पाण्यात ठेवले होते. हे नाकारुन चालनार नाही. त्यांच्या विरोधात सर्व बाजूनी रसद पुरवणारे देखील स्व पक्षातील होते* हे जाहीरपणे परळी मतदार संघात बोलले जात आहे. त्याचाच फायदा विरोधी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला आयता मिळाला. त्यामुळे गोपीनाथ रावांनी मशागतीने उभारलेला मतदारसंघ पंकजांना टिकवता आला नाही असे विश्लेशन करणे म्हणजे जेव्हा कुंपनच शेत खाते... तेव्हा असे घडणारच.
*राजकारणात जय पराजय ही मोठी बाब नाही. इंदीरा गांधी पासून थेट महाजन -मुंडे- देशमुखा* पर्यंत सर्वांनी पराभव पाहीलेला आहे. एखाद्या निवडणूकीत पराभव झाला म्हणजे त्यांच्या नेतृत्वाचा प्रभाव कमी पडला असे होत नाही. मात्र मास लिडर असलेल्या नेतृत्वाला पुन्हा राजकारणात मोठी पदे देवून अशा नेतृत्वाचे महत्व वाढवणे पक्षासाठी फायद्याचे असते अशा पदामुळे अशा नेतृत्वाला अधिक बळ मिळते व त्याचा फायदा पक्षाला होत असतो.
गोपीनाथराव मुंडे यांनी आपला राजकारणात एक ठसा उमटवला. हे नक्की आहे. 1980 नंतरच्या काळात त्यांचे जे प्रस्थ निर्माण झालं, भारतीय जनता पक्षामध्ये त्यांना महत्त्वाचे स्थान मिळाले, आणि त्यांनी आपल्या कर्तुत्वावर मेहनतीने पक्षाचे नेतृत्व आपल्याकडे खेचून आणलं.उपमुख्यमंत्री झाले आणि केंद्रात मंत्रीही झाले. हे सर्व करतांना त्यांना कोणी न्याय दिला नसला तरी त्यांच्यावर कोणी अन्याय केला नाही. त्यांची क्षमता होती त्यांना संधी दिली. मागे खेचण्याचे काम कोणी केले नाही. त्यामुळेच ते लोकनेते झाले. त्यांच्या हातात सत्ता केद्रीकृत झाली. त्यांनी अनेक कार्यकर्र्त्याना न्याय दिला.
आजची स्थिती मात्र तशी नाही. सर्व समाज माध्यमे, इलेक्ट्रॉनीक्स माध्यमावर राज्यसभा, विधानसभा, भाजपाने दिलेले उमेदवार याचा अभ्यास केला तर पंकजा मुंडे या फडणवीसाच्या स्पर्धक आहेत. त्याच एकमेव मास लिडर नेत्या आहेत. त्यांच्याकडे जनता भावी मुख्यमंत्री म्हणून पहात आहे. त्यांना राज्याच्या राजकारणात संधी मिळाली तर फडणवीसांचे महत्व कमी होईल असे त्यांना वाटते म्हणून त्यांना नाकारले जाते. असे विश्लेशन चुकीचे ठरु शकत नाही.
नुकत्याच जाहीर केलेल्या विधान परिषदेच्या सर्व पाचही उमेदवारांच्या उमेदवारीचे विश्लेशन केले तर लक्षात येते की, ओबीसी मधील महत्वाचा घटक असणार्या धनगर समाजातील असलेल्या व पंकजा मुंडे या बंधु म्हणून ज्यांचा उल्लेख करतात त्याच शिंदेंना उमेदवारी देवून पंकजा समर्थकांची मुस्कटदाबी करणे हा उद्देश असल्याचे जाहीरपणे बोलले जाते.मागील वेळेस भागवत करांडाची राज्यसभेची उमेदवारी तसेच त्यांना देणेत आलेले केंद्रीय मंत्रीपद व रमेश कराडांना दिलेली विधान परिषद ही देखील फडणवीसांची राजकीय खेळी होती. मात्र या खेळीत दोन करांडाना राज्यसभा, विधान परिषद मिळाली म्हणून मुंडे समर्थक नक्कीच आनंदी होते. मात्र *पंकजा ताईंर्ंंचे राजकारण खच्ची करण्याचा हा प्रयत्न होता हे सर्वश्रुत असल्याने पंकजा मुंडे समर्थक समाधानी नव्हते. दोन्ही करांडाना मिळालेल्या राजकीय संध्या या फडणवीसांच्या बाजूने जरी डावपेचाच्या असल्या तरी ते ओबीसी व वंजारी समाजाचे मास लिडर नेते* होवू शकत नसल्याने त्यांचा राजकारणातील वाढता प्रभाव हा पंकजाच्या राजकारणावर परिनाम करणारा कधीही ठरनारा नाही.
त्या सोबतच देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असतांना त्यांचे कार्यालयात विशेष कार्यअधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या श्रीकांत भारती यांना विधान परिषद मिळणे म्हणजे फडणवीस नेमके कोणाला उमेदवारी देतात, कोणाला मोठे करतात व पक्षाला कुठे घेवून चालले आहेत हा संशोधनाचा विषय ठरु शकतो. आज फडणवीसांचे सर्व पत्ते सोयीचे आहेत.म्हणून खेळातील फडणवीसांचे पारडे जड वाटते. मात्र खेळातील पत्ते कधीही बदलू शकतात. अशी बदलेली पत्ते राज्य भाजपाला मात्र सोयीची असनार नाहीत.
विधान परिषदेच्या निवडणूकीत केंद्रीय समितीकडून उमेद्वारांची यादी जाहीर झाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील व देवेंद्र फडरवीसांनी ताईंच्या उमेदवारीसाठी मोठे प्रयत्न केले. मात्र त्याला यश आले नाही. त्यांच्यासाठी पक्षाच्या डोक्यात कदाचीत मोठी संधी असेल असे स्पष्ट केले असले तरी हे म्हणने पंकजा समर्थकांसाठी गुळातून विष दिल्यासारखे असल्याचे बोलले जाते.
फक्त वडीलोपार्जीत पुण्याईवर पद उपभोगत बसलेल्यानीं काँग्रेस सारखा पक्ष बुडवला म्हणून भाजपा इथपर्यंत आलय. याचा संदर्भ देत भाजप सवांर्र्ंना न्याय देतो. तुमच्यावर अन्याय झाला अस म्हणंन चुकीच आहे. तुमच्या अन्यायाची शिवसेनेला सल आहे. तसे असेल तर पंकजाताईने शिवसेनेत जरूर जावं. आणि शिवसेनेतर्फे विधानपरिषदेवर निवडून यावं. आपल्या भाजपमध्ये पंकजाताईंना डावललं जातंय मुंडे फॅमिली संपवली जातेय असं जेव्हा शिवसेनेचे प्रवक्ते म्हणतात तेव्हा असे शिवसेनेत किती अडगळीत पडलेले शिवसेनेचे नेते आहेत? डझनावर सांगता येतील. त्यांची फिकीर आहे का? असा सवाल तोरसेकरांनी करत पंकजाताईंनी शिवसेनेत जावे असा जबरदस्तीचा सल्ला दिलाय असे वाटते आहे.
अनेक मााध्यमे, इलेक्ट्रॉनीक मीडीया जेष्ंठ पत्रकारांसह अनेक राजकीय पक्षातील नेतृत्वाकडून, समर्थकाकडून पंकजांना भाजपात डावलंल जातय असे विश्लेशन केलेले आहे. संजय राऊतांच विश्लेशन देखील याच पध्दतीने राजकीय हेतूने असेल अगर सहानुमूतीने किंवा वास्तव असेल त्यांचे विश्लेशन हे त्यांचे व त्यांच्या पक्षाचे मत आहे. या मताचा पंकजाताई अगर त्यांच्या समर्थकांनी कोणताही उल्लेख केलेला नाही. पंकजाताईंनी या बाबत आपली कोणतीही भुमिका व्यक्त केलेली नाही. सेनेच्या घरात काय चाललय, कोणावर अन्याय झालाय हे डोकून पहाण्याची पकजा ताईं व त्यांच्या समर्थकांना आवश्यकता नाही. पंकजा समर्थक हे भाजपाचे निष्ठावाण कार्यकर्ते आहेत. ज्या भाजपाच्या जडणघडणीत गोपीनाथ मुंडे यांचा मोठा वाटा आहे.त्या मुंडे साहेबांचे समर्थक म्हणून कार्यकर्ते भाजपाशी जोडलेले आहेत. ज्या भाजपामध्ये सर्वोच्च पदावर स्व. मुंडे साहेब पोहचले होते. त्या ठिकाणी पंकजा ताईंना पोहचलेले समर्थकांना पहावयाचे आहे.
तोरसेकर साहेबांचा हा मुद्दा मात्र आम्हाला भावला आहे की, तुमचं कर्तृत्व असेल तर तुमच्याविरुद्ध सगळं जग उभ राहो. ज्या भाजपला बहुमताने मोदी सत्तेत घेऊन आले त्या मोदींच्या विरोधात गेली दोन दशके जगभरचा मीडिया उभा आहे. देशभरचा मीडिया उभा आहे. देशातले सगळे पुरोगामी पक्ष आणि भाजपातले अनेक दिग्गज त्याचं मोदींच्या विरोधात उभे ठाकले तरी मोदींना हरवू शकले नाही. कारण ज्या जनतेवर विश्वास ठेऊन मोदी राजकारण करतात त्यांना हरवणं सोपं नसतं. अश्या पक्षामध्ये पंकजाताई तुम्ही खरंच कर्तबगार असाल तर तुमच्यावर कोणीही अन्याय करू शकणार नाही. मग ते फडणवीस असो कि चंद्रकांत दादा पाटील असोत.
शिस्तीच्या पक्षात मात्र पंकजाताईंना स्वत:ची कर्तबगारी दाखवायला मर्यादा पडत आहेत. कारण आहे पक्ष शिस्त, पक्ष धोरण . पंकजा ताईंनी काही धोरण घेतले. राज्यात दौरा सुरु करायचा म्हटले तरी पक्ष शिस्त आडवी येवू शकते. पंकजा ताई पॅरलल संघटना चालवतात. अशी भुमीका पक्षाच्या वरीष्ठ नेत्याकडे पोहचवली जावून पंकजाताईंच्या कर्तृत्वाला ब्रेक लावले जावू शकते. एका बाजूने विश्वासात घेतले जात नाही. तर दुसर्या बाजूने कर्तृत्व सिध्द करु दिले जात नाही. अशी भावना पंकजा समर्थकांची झालेली आहे. तोरसेकर साहेबांनी जरा कर्तत्व सिध्द करण्यासाठी जरा संधी देण्याची भुमिका आपल्या चॅनलवरुन मांडावी अशी समथकांची भावना आहे. त्यामुळेच पंकजा समर्थक किती आहेत. हे दाखवण्याची वेळ आली आहे. तेच तेच दोन चार कार्यकर्ते आहेत की लाखो मुंडे समर्थक आहेत हे पक्ष नेतृत्वाला दाखवून देण्याची गरज असल्याची भावना समर्थकांची झालेली आहे. त्यामुळे समर्थकांनी पंकजाताई,आमच्या आाशा, आमचा वारसा या नावाने महाराष्ट्रातील ओबीसी मतदारांचा प्रभाव असलेल्या 78 मतदार संघातून एक मोहीमी सुरु केली जाणार आहे.
"पंकजााताईना डावलले जातय...! होय, मी नाराज आहे.., आम्ही नाराज आहोत"
या आशयाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याकडे jpnadda@gmail.com या इमेलवर 10 लाख इमेल पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच 1 लाख पत्र/पोष्ट कार्ड भाजप मुख्य कार्यालय दिल्ली येथे पाठवून नाराजी व्यक्त केली जाणार आहे. या मोहीमे मध्ये भाजपातील किती पदाधिकारी व लोकप्रतिनिधीचे समर्थन मिळेल हे आम्हाला माहीती नाही. भाजपामध्ये देखील अनेक पदाधिकार्यांना आगामी नगरपरिषद, पं.स. जिल्हा परिषद, विधानसभा उमेद्वार्या हव्या आहेत. निवडणूकीसाठी मोेठे पैसे लागतात म्हणून अनेक पदाधिकारी, लोकप्रतिनिधी धनदांडगे आहेत. त्यांना इडीची भिती वाटत असेल मात्र जे इडीची बिडी करुन धुर काढतील व आपला खांदा पंकजाताईंच्या नेतृत्वाची उंची वाढवण्यासाठी लावतील अशा अंत्यत सामान्य, ओबीसी, मुंडे समर्थक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ही मोहीम सुरु केली जाणार आहे.
जय हिंद,जय भारत, जय महाराष्ट्र
0 टिप्पण्या