लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
नगर/करंजी:
सुभाष तेलोरे यांनी संगमनेर आगारात आठ महिन्यापूर्वी एसटी बसमधे गळफास घेऊन
आत्महत्या केलेली घटना ताजी असतानाच त्यांचा धाकटा मुलगा उद्धव सुभाष तेलोरे (वय-२१
वर्षे ) याचा मंगळवारी दुपारी ट्रक मोटरसायकल अपघातात नगर येथे दुर्दैवी मृत्यू
झाला. तसेच श्रीकांत तेलोरे हे देखील नगर आगारात एसटी सेवेत असताना दाेन
महिन्यापूर्वी रात्री ड्युटीवरून येत असताना कोल्हार घाटाच्या पायथ्याशी
रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला त्यांच्या मोटर सायकलची धडक बसून त्यांचा
देखील अपघातात जागीच मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना त्यांचा धाकटा मुलगा
बाळकृष्ण श्रीकांत तेलोरे (वय २१ वर्षे) याचाही मंगळवारी सुभाष तेलोरे बरोबर नगरला
मोटरसायकलवर नोकरीच्या शोधात गेलेला असताना दोघांचाही नगरमध्ये दुर्दैवी मृत्यू
झाल्याने कोल्हार गावावर मोठी शोककळा पसरली आहे.
उद्धव
सुभाष तेलोरे हा नगर येथील एका इंजिनियरच्या हाताखाली नोकरी करत होता त्याच्या
ओळखीने बाळकृष्ण तेलोरे हा सख्खा चुलत भाऊ एमआयडीसीत नोकरी शोधण्यासाठी आज नगरला
सुभाष बरोबर आला होता. नोकरीची शोधशोध सुरू असतानाच या दोन्ही चुलत भावंडांवर
काळाने घाला घातला व ट्रक मोटरसायकलच्या अपघातात या दोघा भावंडांना आपला जीव
गमवावा लागला त्यामुळे कोल्हार गावावर मोठी शोककळा पसरली आहे.
कोल्हारच्या
चुली पेटल्या नाही
कोल्हार
गावात तेलोरे कुटुंबाची दोनच घरे असून या दोन्ही घरावर दुर्दैवाने मोठी दुःखद घटना
घडल्याने व घरातील दोन होतकरू तरुणांचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे कोल्हार गावात
मंगळवारी चुली देखील पेटल्या नाहीत अशी वेळ कोणावरच येऊ नये अशी भावनिक
प्रतिक्रिया माजी सभापती संभाजी पालवे, विजय पालवे,माजी सैनिक
फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष शिवाजी पालवे यांनी दिली.
0 टिप्पण्या