Ticker

6/Breaking/ticker-posts

मुगुंसवाडेचे शिक्षक भागवत गर्जे यांचा सेवापुर्ती सत्कार

 १० वीच्या विद्यार्थाना निरोप



लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

खरवंडी कासार :

श्रावण भारती बाबा प्रशाला मुगुंसवाडे येथील शिक्षक भागवत गर्जे हे  सेवा निवृत्त होत असल्याने त्यांचा शाळेच्या वतीने  सन्मान व सत्तकार करण्यात आला तसेच दहावी च्या विदयार्थाना परिक्षेसाठी शुभेच्छा व  निरोप समारंभाच्या कार्यक्रमाचे आयोजन श्रावण भारती प्रशाला मुगुंसवाडे येथे करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थाणी मुगुंसवाडे येथिल हभप शुकलभारती महाराज हे होते तर प्रमुख पाहुने म्हणुन भाजपा जिल्हा उपअध्यक्ष गोकुळ दौंड हभप संतोष गिरी महाराज तुळजाभवानी सस्थान चे महंत संतोष महाराज खताळ सरपंच प्रविण खेडकर राजेंद्र हिगें जगनाथ गुळवे मुख्याध्यापक इ बी ईखे  आबासाहेब खेडकर संदीप गर्जे उपस्थित  होते 

यावेळी दौंड म्हणाले की 

गुरुवर्याच्या मार्गदर्शना खाली अभ्यासरुपी केलेले ज्ञानग्रहन याचे मनपुर्वक चिंतन करा, आपले आराध्य दैवत गणपती,सरस्वती,लक्ष्मी यांचे स्मरण करूण मनलाऊन अभ्यास करा आणि कॉफीमुक्त परिक्षा द्या तुम्हीच तुमच्या जिवनाचे शिल्पकार आहात, आपल्या जिवणाला आकार देण्याचे काम ही आपलेच आहे संत भगवान बाबांचे एकच ब्रिद वाक्य होते आपण शिका,आपल्या आयुष्यात गगन भरारी घ्या,यश तुमचेच आहे 

यावेळी खरवंडीचे माजी उपसरपंच शरद दहिफळे राजेंद्र जगताप आजीनाथ जायभाये किशोर जगताप  उपस्थित होते प्रस्ताविक मुख्याध्यापक ई . बी . ईखे तर 

कार्यक्रमाचे सुत्रसचांलन सजंय ढाकणे यांनी केले उपस्थिताचे आभार अरूण फुंदे यांनी मानले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या