लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
शेवगाव: येथे नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी खासदार सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी नायब तहसिलदार मयूर बेरड यांना निवेदन देउन मलिक देशद्रोही असल्याचा आरोप करीत निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.
याप्रसंगी भाजपचे जिल्हा अध्यक्ष अरुण मुंडे, जि प सद्स्य राहुल राजळे,भाजपचे तालुका अध्यक्ष ताराचंद लोंढे, अभय आव्हाड, बापूसाहेब पाटेकर ,पाथर्डीचे नगराध्यक्ष डॉ. मृत्यूजय गर्जे, नगराध्यक्ष नंदकिशोर शेळके, सभापती गोकुळ दौंड,अजय रक्ताटे,प्रतीक खेडकर ,शेवगावचे उप नगराध्यक्ष वजीर पठाण, नगरसेवक सागर फडके,अमोल सागरे, सरचिटणीस भिमराज सागरे,बजरंग घोडके,प स सुभाष केकान ,सद्स्य एकनाथ आट कर,संभाजी वाघ,दत्ता बडे,विजय कापरे, पृथ्वीराज पाथरे,शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.
0 टिप्पण्या