Ticker

6/Breaking/ticker-posts

केदारेश्वरला उर्जीतावस्थेत आणण्याचे काम केले- चेअरमन ॲड प्रताप ढाकणे

 ४ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन पूर्ण



लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 बोधेगाव : केदारेश्वरला सहकारी साखर कारखान्याला उर्जीतावस्थेत आणण्याचे काम सर्वांच्या सहकार्याने आणी संचालक मंडळाच्या मदतीने पूर्ण केल्याचे प्रतिपादन चेअरमन ॲड प्रताप ढाकणे यांनी केले.

 मंगळवारी दि.२८ रोजी  कारखान्याने ४ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन पूर्ण केल्यानंतर साखर पोती पुजन प्रसंगी ते बोलत होते. शेवगांव तालुक्याच्या पुर्व भागातील उजाड माळरानावर उभा केलेल्या संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर साखर कारखान्यामुळे परिसरातील हजारो तरुणांच्या हताला काम मिळाले,बोधेगावची  बाजारपेठ फुलली, कष्टकरी, उस तोड कामगार,उस उत्पादक शेतकरी अशा सर्वाना बरोबर घेउन काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.दरम्यान कारखाना चालवण्याचे नियोजन संचालक मंडळाने केल्यापासून कारखान्याच्या प्रगतीत वाढ झालेली आहे. गेल्या  वर्षी चार लाख मे टन उसाचे गाळप केल्यानंतर चालु वर्षी सहा लाख मे  टनाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आले  त्यादृष्टीने नियोजन चालु आसल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी  कार्यकारी संचालक रमेश गर्जे, चिफ केमिस्ट सांगळेमाजी तहसीलदार राजेंद्र दराडे, शेतकी आधिकारी अभिमन्यू विखे, चार्टर आकांउटन तीर्थराज घुंगऱड, प्रशासकीय अधिकारी पोपट केदार, केनयार्ड सुपरवायझर किसन पोपळे, वर्क शॉप फोरमन रघुनाथ सानप, सुरक्षा अधिकारी राजाराम केसभट,अंबादास दहिफळे, कारभारी जावळे, संजय ढाकणे,श्रीराम घोडके, रावसाहेब दहिफळे उपस्थित होते..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या