निवडीला औरगांबाद खंडपिठाकडुन स्थगीती ;
घोषीत विजयी उमेदवार फेरमत मोजणीत पराभुत झाल्याने प्रकरण गेले खंडीपिठात
लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
खरवंडी कासार:- पाथर्डी तालुक्यातिल भालगाव सेवा सहकारी संस्थेच्या चेअरमन व व्हा चेअरमनच्या निवडीला उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने स्थगीती दिली आहे. सेवा संस्थेच्या निवडणुकीतील पराभुत उमेदवारांनी न्यायालयात धाव घेतल्याने न्यायालयाने प्रतिवादींना नोटीसा बजावल्या आहेत. आण्णासाहेब भुजंग ढाकणे व सुभद्रा कोरडे यांना भालगाव सेवा संस्थेच्या संचालक पदाच्या निवडणुकीत निवडणुक निर्णय अधिका-यांनी विजयी घोषीत केले होते. त्यानंतर फेरमतमोजणी झाली व विजयी झालेल्या दोन्ही उमेदवारांना पराभुत घोषीत केले गेले. ढाकणे व कोरडे यांनी औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या खंडपीठात याचिका दाखल करुन दाद मागतली होती.
5 मार्च २०२२ रोजी भालगाव सेवा संस्थेच्या संचालक मंडळाची निवडणुक पार पडली. त्यामधे आण्णासाहेब ढाकणे व सुभद्रा कोरडे यांना विजयी घोषीत केले. विजयी उमेदवारांनी गुलाल उधळला. त्यानंतर पुन्हा त्यांना निवडणुक निर्णय अधिका-यांनी पराभुत उमेद्वार घोषीत केले. त्यामुळे आण्णासाहेब ढाकणे व सुभद्रा कोरडे यांनी अँड.राहुल करपे ,अँड.संदीप मुंडे यांच्या मार्फत खंडपीठात धाव घेतली. तेथे सुनावणी झाली. भालगाव सेवा संस्थेच्या चेअरमन, व्हा.चेअरमन पदाच्या निवडणुकीला स्थगीती देवुन प्रतिवादींना नोटीसा बजावण्याचे आदेश न्यायाधीश नितीन सुर्यवंशी यांनी दिले आहेत. निवडणुक निर्णय अधिका-यांच्या या दुहेरी भुमिकेमुळे भालगावची निवडणुक चांगलीच गाजली आहे.
औरंगाबाद खंडपीठातील न्यायालयाच्या निर्णयानंतर भालगावमधे फटाके वाजवुन स्वागत करण्यात आले. भालगाव सेवा संस्थेची निवडणुक प्रक्रिया संशयास्पद रितीने राबविली आहे. ही निडणुक पुन्हा घेण्यात यावी अशी मागणी ढाकणे व कोरडे यांच्या वतीने करण्यात आली आहे.
0 टिप्पण्या