Ticker

6/Breaking/ticker-posts

शहरातील प्रत्येक प्रभाग समस्यामुक्त करणार - महापौर

 नगरसेवक शाम नळकांडे यांच्या प्रयत्नातून शितल कॉलनीत कॉक्रीटीकरण सुरु






(छाया : राजु खरपुडे)

 लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

नगर: कल्याण रोड परिसरातील विकासासाठी भरघोस निधीची तरतुद केली आहे, या निधीमधून आता विविध विकास कामे मार्गी लागत आहेत. नागरिकांना सोयी-सुविधा पुरविण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्नशील असून, आणखी निधी उपलब्ध करुन एक चांगला व समस्यामुक्त प्रभाग करण्याचा प्रयत्न राहणार आहे. त्याचबरोबरच शहरातील विविध भागातही अशाच स्वरुपाची कामे पूर्ण करुन आपले शहर स्वच्छ व सुंदर करावयाचे आहे. त्यासाठी नगरसेवक व प्रशासनाचे सहकार्याने आपले प्रयत्न सुरु असल्याचे प्रतिपादन महापौर रोहिणी शेंडगे यांनी केले.

 

नगरसेवक शाम नळकांडे यांच्या प्रयत्नातून प्रभाग क्र.8 मधील कल्याणरोड येथील शितल कॉलनीतील रस्ता कॉक्रीटीकरण कामाचा शुभारंभ महापौर रोहिणी शेंडगे यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी महिला बाल कल्याण समितीच्या सभापती पुष्पा बोरुडे, शहरप्रमुख संभाजी कदम, माजी विरोधीपक्ष नेते संजय शेंडगे, नगरसेवक सचिन शिंदे, शाम नळकांडे, गणेश कवडे, माजी उपमहापौर अनिल बोरुडे, शिक्षक सेनेचे शहर जिल्हाध्यक्ष पारुनाथ ढोकळे, प्रा.उत्तम राजळे, संतोष ठाणगे, भगवान काटे, घनश्यमा घोलप, योगेश चौधरी, सचिन लगड, सुहास लगड, सुहास चौधरी, रामदास गोसावी, दिनकर आघाव, बबन साबळे, संतोष हजारे, प्रकाश म्हस्के, शशिकांत तांबे, संजय गर्जे, गुलाब कार्ले, धनंजय कापरे, रणजित कुताळ, बाबा चौधरी, मधुकर थोरात, संतोष चौधरी, लक्ष्मण खोडदे, सतीश गिते, जयप्रकाश डिडवाणीया, बाळासाहेब फंड, भाऊसाहेब लवांडे, मनोज शिंदे, संजय साकोरे, मदने आदि उपस्थित होते.

    नगरसेवक शाम नळकांडे म्हणाले, कल्याण  रोडच्या विकासासाठी या भागाचे सर्वच नगरसेवक प्रामाणिक प्रयत्न करत आहेत. सर्वांच्या पाठपुराव्यामुळे या भागाच्या विकासासाठी महापौर रोहिणीताई शेंडगे यांनी निधी उपलब्ध करुन दिल्याने मुलभुत विकास कामांना चालना मिळाली आहे. त्याही या भागाचे प्रतिनिधीत्व करत असल्याने भविष्यात या भागातील सर्वच प्रश्न मार्गी लागतील असे सांगितले.

     याप्रसंगी पुष्पा बोरुडे, गणेश कवडे, सचिन शिंदे आदिंनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन पारुनाथ ढोकळे यांनी तर आभार प्रा.उत्तम राजळे यांनी मानले. यावेळी शितल कॉलनीचे श्री छत्रपती कॉलनीअसे नामकरण करण्यात आले.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या