लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नेवासा: राजेगाव ता नेवासा येथे ना
शंकरराव गडाख यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर स्व बाळासाहेब ठाकरे स्मृती
मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना अंतर्गत बांधण्यात आलेल्या राजेगाव
ग्रामपंचायतच्या ११.५५ लाख रुपये खर्चाच्या नूतन इमारतीचे लोकार्पण व राजेगाव ते
घोडेगाव डांबरीकरण व मजबुतीकरण किंमत ३५ लाख रुपये या कामाचे भूमिपूजन नेवासा पंचायत
समितीच्या माजी सभापती सुनीता गडाख यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी
गडाख म्हणाल्या की, ना. शंकराव गडाख यांचे हात बळकट करून
संघटनेला ताकद द्या सार्वजनिक विकासकामांचे प्रस्ताव द्या. कामे पूर्ण करण्याचा
शब्द मी तुम्हाला देते, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी
विश्वास दाखवून आपल्या तालुक्याला जी मंत्रिपदाची संधी दिली शंकरराव गडाख यांना
मंत्री पदाच्या माध्यमातून तालुक्यामधील मोठ्या
प्रमाणात विकास विकास कामे पूर्ण केले आहेत, घोडेगाव मध्ये
नगर मधील सिव्हिल रुग्णालयाच्या बरोबरीचे सर्व सुविधायुक्त सुसज्ज रुग्णालय सुरू
झाल्याने सर्वसामान्य रुग्णांना याचा मोठा लाभ मिळणार आहे.
ना. शंकरराव गडाख यांनी नेवासा
तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उताऱ्यावर असलेल्या पोटखराब्याचा असलेला मोठा प्रश्न
मार्गी लावला आहे. तसेच वर्ग दोनच्या जमिनीवर कर्ज मिळत नसायचे यापुढे वर्ग दोनच्या
जमिनीवर देखील कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच जल जीवन मिशन अंतर्गत
राजेगाव गावासाठी ६५ लाख रुपये खर्चाच्या पाणी योजनेचे काम ना. गडाख व अर्थ
समितीचे सभापती सुनील गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली मार्गी लागणार आहे.
मागील
पाच वर्षात फक्त नारळ फोडण्याची काम झाले एका रस्त्याला दोन्ही बाजूंनी नारळ फोडले
गेले परंतु रस्त्यांची कामे झाली नाही परंतु यंदा तसे न होता तालुक्यामध्ये विविध
रस्त्यांची व विविध विकास कामे सुरू झाली आहेत यापुढेही आपण रस्त्यांचे व विविध विकास कामांना
प्राधान्य देणार आहोत, आपण कामांचे प्रस्ताव द्या ती कामे
पूर्ण करण्याचा मी ना. शंकराव गडाख यांच्या वतीने शब्द देते असा विश्वास गडाख
यांनी उपस्थित नागरिकांना दिला.
यावेळी कारभारी जावळे,रावसाहेब कांगुणे,बाळासाहेब सोनवणे, सतीशराव थोरात सरपंच यांची भाषणे झाली. जि. प. सदस्या सविता अडसुरे ,पंचायत समिती सभापती रावसाहेब कांगुणे , सदस्य बाळासाहेब सोनवणे, पार्वती जावळे, वैशाली एडके, सरपंच सतीश थोरात, अनिल अडसुरे, महादेव दराडे, सरपंच अंबादास आव्हाड, सचिन आव्हाड ,महादेव दराडे, नितीन शेटे, दादासाहेब दरंदले, किसन आवारे, विठोबा आव्हाड, शिवाजी आव्हाड, तुकाराम आव्हाड, लक्ष्मण घुले, हरिचंद्र कोरके, पांडुरंग शिरसाठ, पाडूरंग आव्हाड, उपसरपंच, बाबासाहेब मांडवकर, मनीषा आवारे, सुशीला आव्हाड, कांताबाई पालवे, गटविकास अधिकारी शेखर शेलार,ग्रामसेवक सुखलाल हारदे,आदींसह राजेगाव,शिंगवेतुकाई, परिसरातील नागरिक उपस्थित होते.
0 टिप्पण्या