लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क
पारनेर: तालुक्यातील कान्हूर पठार येथे तरस या वन्य
प्राणी भाजून खात असताना वन विभागाने केलेल्या कारवाईमध्ये एक जण ताब्यात घेण्यात
आला होता उर्वरित दोन जण फरार होते त्यापैकी एक जणास वन विभागाने ताब्यात घेतले
असून दोन्ही आरोपींना कोर्टात हजर केले असता दि. २५ फेब्रुवारी पर्यंत वनकोठडी देण्यात आली आहेत.
कान्हूर
पठार येथे दि.१७ रोजी प्राथमिक
आरोग्य केंन्द्रानजीक असणाऱ्या वैदू वस्तीवर तरस जातीचा प्राणी
भाजण्यात आला असून त्याला खाण्याची तयारी असल्याची खबर वनविभागाला मिळाल्यानंतर या
ठिकाणी वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रताप जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली
भाळवणी परिक्षेत्राचे सी ए रोडे व
संदीप भोसले यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह छापा टाकला त्यात एक आरोपी ताब्यात
घेण्यात आला दोन जण फरार झाले होते.
ताब्यात घेतलेल्या आरोपी सुरेश दत्तू शिंदे हजर
केल्यानंतर दि.२३ पर्यंत वन कस्टडी देण्यात आली होती त्याची वन कस्टडी संपलेली होती तसेच दुसरा आरोपी संतोष आनंदा वाळुंज वय ४० राहणार
काकणेवाडी याला वन अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतला त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर
दोन्ही आरोपींना कोर्टासमोर दि.२३ रोजी हजर केले असता त्यांना दि. २५ पर्यंत वन
कस्टडी देण्यात आली आहे त्यातील अमृतराव आनंदा भागवत राहणार विरोली हा आरोपी
अद्याप फरार असून त्याने तरसाची वाहतूक करण्यासाठी वापरलेली दुचाकी मिळणे बाकी आहे
तसेच विरोली कान्हूर रस्त्यालगत मृतावस्थेत आढळला होता तो तरस भाजून खाण्याचा
प्रयत्न केला असल्याने त्यांच्याकडून पुरावे घेणे बाकी असल्याने वनाधिकाऱ्यांनी
आरोपींना वन कस्टडी ची मागणी केली होती.
या
कारवाईत उपवसंरक्षक सुवर्णा माने सहा. वनसंरक्षक,रमेश देवखिळे यांच्या
मार्गद्शनाखाली वन परिक्षेत्र अधिकारी प्रताप जगताप वन परिमंडळ अधिकारी संदिप
भोसले छबू रोडे नाना जाधव फारुख शेख,निर्मला शिंदे,उमा केंद्रे,वनरक्षक निलेश बडे बाळू पाचर्णे,बंडू गोरे,दादाभाऊ तिकोने वनमजूर यांनी सहभाग घेतला
होता.
0 टिप्पण्या