लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
नगर: वंचित बहुजन महिला आघाडीच्या प्रदेश महासचिव, राज्य कमिटी सदस्य अरुंधती
शिरसाठ यांच्या प्रमुख उपस्थितीत अहमदनगर महिला जिल्हा, तालुका,
शहर निहाय कार्यकारणी जाहिर करण्यात आली.
अहमदनगर दक्षिण जिल्हा महिला समन्वयक धनश्री शेंडगे, रोहिणी देठे व शहर समन्वयक
स्तुती सरोदे, जिनत खान, बेबी निरभवणे,
जयश्री शिंदे, मोनाली साळवे आणि पारनेर तालुका
महिला समन्वयक मनीषा रोकडे, श्रीगोंदा तालुका महिला समन्वयक
स्वाती खंडागळे यांची नेमणूक करण्यात आली. श्रीगोंदा, पारनेर,
नगर तालुका आणि शहरासह अन्य भागातून महिला उपस्थित होत्या.
तसेच भिंगार शहर कार्यकारणी जिल्हाध्यक्ष प्रतिक बारसे आणि शहर
जिल्हाध्यक्ष संजय जगताप, शहर
उपाध्यक्ष प्रवीण ओरे यांच्या नेतृत्वाखाली भिंगार शहराध्यक्षपदी शिरसाट जोसेफ,
भिंगार शहर महासचिवपदी विजय कांबळे, भिंगार
शहर उपाध्यक्षपदी गणेश राऊत, उपाध्यक्ष राजीव भिंगारदिवे,
उपाध्यक्षपदी शेख शादाब पिर मोहम्मद, भिंगार
शहर संघटकपदी लक्ष्मण ओव्हाळ, संघटक धम्मपाल शिंदे, संघटक अभय आवटी, संघटक अक्षय बनसोडे जाहीर करण्यात
आले.
यावेळी भिंगार शहरातील शेकडो युवकांनी वंचित बहुजन आघाडीत युवा
जिल्हाध्यक्ष संतोष जठार आणि युवा महासचिव विशाल साबळेयांचे नेतृत्वखाली भूषण
कांबळे, पवन
वाघमारे, विलास भिंगारदिवे, विक्रम
मेडरुलिया, रोहिदास चखाले यांनी प्रवेश केला. यावेळी अजीम
शेख, जीवन पारधे, अमर निरभवणे, अक्षय शिंदे, भाऊ साळवे, मनोज
कर्डिले, प्रमोद आढाव आदीसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन आणि आभार योगेश साठे यांनी केले.
0 टिप्पण्या