Ticker

6/Breaking/ticker-posts

हनी ट्रॅपमध्ये अड्कला बडा अधिकारी ‘डोळस’ असूनही ‘तो’ झाला आंधळा, काय सांगता राव.. ‘आंधळा मारतोय डोळा..’





 लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

श्रीगोंदा : तालुक्यातील एका महिलेने सरकारी अधिकाऱ्यावर हनी ट्रॅप करून लाखो रुपये उकळल्याची चर्चा सुरू झाली आहे. हा अधिकारी नेमका कोणकोणत्या विभागातीलया विषयी तर्क वितर्क लढविले जाऊ लागले आहेत.
डोळस’ असूनही ‘तो’ झाला आंधळा
मग ‘"तिने" त्याला चांगलाच लुबाडला
वेड्याचे सोंग घेऊन पेडगावला गेला;

घर रिकामेचतरीही दोन लाखांचा किरणा भरला.

महाभारताचे युद्ध युदिष्ठिराला ‘संजया’ने सांगितलेअशी अख्यायिका आहे. नावातच इतका ‘डोळस’ असूनही तो तिच्या’च्या सौंदर्याला भुलला आणि आपल्याच हाताने आपल्याच पायवर  "धोंडा" मारल्याचा अनुभव त्यास आला. नगर जिल्ह्यात ‘हनीट्रॅप’चे प्रकार दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. यातून पोलिसराजकीय मंडळींसह सर्वसामान्यही सुटले नाहीत. कोणी पसार आहेतर कोणी गजांआड आहे. भोवती सगळे दिसत असतानाही माणसे मोहात पडतात आणि स्वत:च्याच पायावर कुर्‍हाडीने काय किंवा कुदळीने प्रहार करतात.

अशीच एक घटना श्रीगोंदा शहरात नुकतीच उघडकीस आली आहे. मात्र, ‘तेरी भी चूप और मेरी भी चूप’ अशी परिस्थिती आहे. यात ‘डोळस’ असलेला तो मात्र पुरता  फसला. एक शासकीय सेवकअधिकारीच म्हणा ना. बाहेरगावाहून श्रीगोंद्यात बदलून आला. नोकरीच्या ठिकाणी जातानाच्या रस्त्यावर त्याला ती दिसली. भोळी भाबडी समजून तिच्यात तो गुरफटला पण ‘ती’ त्याच्यासाठी खड्डा खणणारी  निघाली. ज्या सौंदर्यावर तो भाळला ते ‘निर्मळ’ नव्हतेच कधीयाचा अनुभव त्याला कालांतराने आला. तेव्हा ‘त्याला’ आपलेच महाभारत झाल्याचे कळाले. ‘डोळस’ असूनही आपण अंधळे असल्याची जाणीव होईपर्यंत तर हातून सगळे निघून गेले होते. तिने त्याला दोन लाखांना लुबाडले आहेयाची दबक्या आवाजातली चर्चा आताशी कुठे सार्वजनिक झाली आहे.


तालुक्यातील एका महिलेने सरकारी बाबूला ‘हनी ट्रॅप’मध्ये गुंतविल्याच्या प्रकरणाबद्दल लोक सर्रास बोलू लागले आहेत. संबंधित बाबू देखील झालेल्या प्रसंगाला पुष्टी देत असल्याची माहिती आहे. मात्रतरीही बेअब्रु होऊ नयेयासाठी तो गप्प बसून आहे. 
सुमारे दोन वर्षांपूर्वी श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी परिसरातही असाच प्रकार घडला होता. तेव्हा म्हणे कोणाच्या तरी ‘डोक्यात भुसा भरला होता’ आणि तेव्हा ‘ती’ने ‘थाळीनाद’ केला होता. आता तर हा सरकारी बाबू ‘डोळस’ असूनही आंधळा झाल्याचे ऐकायला मिळत आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या