Ticker

6/Breaking/ticker-posts

लता दीदी गायकांसाठीचालते-बोलते विद्यापीठ होते -संभाजी कदम

 शिवसेनेच्यावतीने गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांना श्रद्धांजली 





लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

नगर : शुद्ध, सुंदर, अविस्मरणीय, अप्रतिम अशा हजारो गाण्यांना आवाज देऊन लता दिदींनी कोट्यावधी रसिकांच्या हृदयात अजरामर अढळ स्थान निर्माण केले. त्यांनी शब्दांचे आपल्या गोड आवाजाने सोने केले. संघर्षमय जीवनातून आपल्या आवाजाने स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण करुन उदयन्मुख गायकांसाठी ते एक चालतेबोलते विद्यापीठ होते, अशा शब्दात शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम यांनी श्रद्धांजली अर्पण केली. 

शिवसेनेच्यावतीने गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी महापौर रोहिणी शेंडगे, शहर प्रमुख संभाजी कदम, माजी महापौर भगवान फुलसौंदर, अभिषेक कळमकर, युवा सेना जिल्हाध्यक्ष विक्रम राठोड, दिलीप सातपुते, बाळासाहेब बोराटे, अशोक बडे, गणेश कवडे, सचिन शिंदे, दत्ता जाधव, मदन आढाव, योगीराज गाडे, विजय पठारे, संदेश कार्ले, दिपक खैरे, स्मिता अष्टेकर, आशा निंबाळकर, अरुणा गोयल, कांता बोठे, अशोक दहिफळे, दत्ता सप्रे, भागचंद भाकरे, संतोष गेनप्पा, परेश लोखंडे, पारुनाथ ढोकळे, गौरव ढोणे, अरुण झेंडे, उमेश काळे, घोलप आदि उपस्थित होते.

यावेळी महापौर रोहिणी शेंडगे म्हणाले, गायन क्षेत्रात आपल्या अविट गोडीच्या गाणांनी रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणार्‍या लता दिदींनी सर्वांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. आज लता दिदी आपल्या नसल्यातरी त्यांच्या गाण्यातून त्या अजरामर राहतील. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनीही लता दिदींच्या आठवणींना उजाळ देत श्रद्धांजली अर्पण केली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या