Ticker

6/Breaking/ticker-posts

जर शेतकऱ्यांवर अन्याय केला तर गाठ माझ्याशी..आमदार रोहित पवार

 









लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क

जामखेड : गेली सत्तर वर्षाच्या काळात नान्नज सेवा संस्थेत काय झाले हे मला माहित नाही. मात्र काहीजण स्वतःची मालकी कायम टिकवण्यासाठी लढतात. कर्ज रूपी दिलेला पैसा हा उपकार होत नाही. कर्जाचा पैसा हा तुमच्या हक्काचा पैसा आहे. येणाऱ्या काळात शेतकऱ्यांच्या हक्कासाठी जातीने लक्ष घालणार आहोत. तसेच ही सेवा संस्था आपल्याच ताब्यात येणार असल्याने निवडून  येणाऱ्या उमेदवारांनी जर शेतकऱ्यांवर अन्याय केला तर त्यांची गाठ माझ्याशी राहील असा सणसणीत इशारा आमदार रोहित पवार यांनी दिला आहे.

 

नान्नज विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या निवडणुकीसाठी सायंकाळी शेतकरी विकास पॅनलच्या प्रचारार्थ प्रचार फेरी काढून गावातील ग्रामदैवतांना आमदार रोहित पवार यांच्या हस्ते नारळ वाढविण्यात येऊन प्रचाराचा श्रीगणेशा करण्यात आला. यावेळी नंदादेवी मंदिराच्या सभागृहात आमदार रोहित पवार बोलत होते. यावेळी नान्नज परिसरातील राजेवाडी, पोतेवाडी, गुरेवाडी, महारुळी येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा आ. रोहित पवार यांच्या हस्ते नुकताच पार पडला.

 

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, कर्जत जामखेड विधानसभा अध्यक्ष मधुकर राळेभात ,सभापती सूर्यकांत मोरे, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष शहाजी राजेभोसले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती चंद्रकांत राळेभात, संचालक त्रिंबक कुमटकर, नान्नजचे माजी सरपंच संतोष पवार, जवळा गावचे सरपंच प्रशांत शिंदे, नान्नज सेवा संस्थेचे उपाध्यक्ष बाबासाहेब कोरडे, पोतेवाडीचे सरपंच प्रवीण पोते, राष्ट्रवादी काँग्रेस युवक तालुकाध्यक्ष शरद शिंदे , गुरेवाडीचे सरपंच लक्ष्मण ढेपे, सागर पवार, बाळासाहेब गोरे,अंकुश मोहळकर ,आजिनाथ कुमटकर, अमर चाऊस, भाऊसाहेब जगदाळे आदी मान्यवरांसह सभासद मतदार, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

यावेळी मधुकर राळेभात ,संतोष पवार ,शहाजी राजेभोसले यांनी सेवा संस्थेच्या कारभाराचे मोठे वाभाडे काढून संस्थाचालक तुषार पवार यांचे नाव न घेता मोठ-मोठे गंभीर आरोप करून आपल्याकडे संपूर्ण पुरावे असल्याचे माजी सरपंच संतोष पवार यांनी आपल्या भाषणात सांगितले आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष पवार यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. लक्ष्मण ढेपे यांनी मानले. 

नान्नज सेवा संस्थेसाठी 26 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून याच दिवशी मतदानानंतर लगेच निकाल जाहीर करण्यात येणार आहे. शेतकरी विकास पॅनलच्या उमेदवारांसाठी आमदार रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दोन बैठका घेण्यात आल्या आहेत. तर संस्थाचालक तुषार पवार यांच्या जनसेवा पॅनलच्या उमेदवारांनी मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटीवर मोठा भर दिला आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या