Ticker

6/Breaking/ticker-posts

ग्रामीण भागाच्या विकासासाठी कटीबध्द -ऋषिकेश ढाकणे

 टाकळी मानुर येथे ढाकणे यांची जिल्हा नियोजन समितीवर निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने सत्कार 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

टाकळी मानूर :

ग्रामीण भागाच्या विकासासाठी गावागावातील प्रलंबित प्रश्नाचा अभ्यास करून प्रत्येक गावात नवीन आर्थिक वर्षापासून पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून पाठपुरावा करत प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाईल, असे प्रतिपादन संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ज्ञ संचालक ऋषिकेश ढाकणे यांनी केले.

पाथर्डी तालुक्यातील टाकळी मानुर येथे ढाकणे यांची जिल्हा नियोजन समितीवर निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते पुढे बोलताना ढाकणे म्हणाले की राज्यातील महा विकास आघाडी सरकार शेतकरी ग्रामीण भागाच्या प्रश्नासाठी सातत्याने विविध प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत माझी जिल्हा नियोजन समितीवर झालेली निवड ही सर्वसामान्य चा हितासाठी अहोरात्र परिश्रम करून अभ्यास करून विविध प्रश्न तालुक्यातील मार्गी लावण्यासाठी मी कटीबध्द आहे .

माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांना याच गटाने दिल्लीपर्यंत पाठवले आहे त्याच गटातील गावांमध्ये माझा सत्कार होत असल्याने मी भारावून गेलो असून हा गट सातत्याने ढाकणे कुटुंबियांच्या पाठीशी राहिला आहे यावर्षी टाकळीमानुर परिसरामध्ये ऊसक्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने शेतकऱ्यांच्या उसाचे नुसकान होऊ नये व शेतकऱ्यांना दोन रुपये मिळावेत म्हणून केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे ला जास्तीत जास्त ऊस गाळपासाठी नेण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे यावेळी माजी सभापती गहिनीनाथ शिरसाट राजेंद्र नागरे माजी सरपंच अर्जुन शिरसाट एमपी आव्हाड पिनू मंचरे भास्कर बांगर भीमराव फुंदे अशोक शिरसाट संदीप शिंदे हरिभाऊ मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या