लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
सन २०१७ ते २०२१ या कालावधीत संबंधीत गोल्ड व्हँल्यूअर व कर्जदार यांनी वेळोवेळी संगनमत करुन बनावट दागीने खरे असल्याचे दाखवून मुल्यांकन दाखले देवून बँकेकडून कर्ज घेतले. कर्जदारांना वेळोवेळी नोटीसा देवूनही त्यांनी बँकेत तारण ठेवलेले सोने सोडून घेतले नाही. म्हणून काही दिवसांपूर्वी नगर येथे बँकेच्या मुख्य शाखेत या पिशव्यातील सोन्यांचा लिलाव ठेवण्यात आला होता. मात्र त्यातील सोने बनावट असल्याचे निष्पन्न झाले होते. वरील चार वर्षाच्या कालावधीत १५९ कर्जदारांनी ३६४ पिशव्यात २७ किलो ३५१.१० ग्रँम सोने बँकेकडे तारण ठेवून सुमारे ५ कोटी ३० लाख १३ हजार रुपये कर्ज घेतले होते.
या गुन्हयाचा तपास येथील आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. तेव्हापासून दहिवाळकर फरार झाला होता. त्याचा पोलीस शोध घेत होते. आज शुक्रवार ता.११ रोजी गुप्तखब-याने दिलेल्या माहीतीवरुन सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र बागुल, पो.हे.काँ. प्रशांत नाकाडे, पो.ना.अभय लबडे यांनी सापळा रचुन त्यास खंडोबानगर येथील घरातून ताब्यात घेतले. त्यास आज शनिवारी शेवगाव येथील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
0 टिप्पण्या