लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
नगर: हिंद्वी स्वराज्याचे संस्थापक,
अखंड देशाचे श्रध्द्स्थान श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शहरासह
जिल्हाभरात विविध उपक्रमानी उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वच स्तरातून छत्रपती
शिवाजी महाराजांच्या प्रतीमेचे पुजन करुन अभिवादन करण्यात आले.
प्रधान डाकघरमध्ये अहमदनगर मध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे
आयोजन करण्यात आले होते.
रक्तदान शिबिरांचे आयोजन
जिल्हाभरात युवक मंडळानी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त प्रारंभी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करुन रक्तदान
शिबिरे घेण्यात आली. यातून सामाजीक संदेश देत अनेक रक्ताच्या बाट्ल्या संकलीत केल्या.
प्रधान डाकघर येथे प्रवर
अधिक्षक एस.रामकृष्ण यांचे हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतीमेचे पुजन करण्यात
आले. यावेळी प्रभारी सिनियर पोस्टमास्तर संदीप कोकाटे, वंदना मिलिंद
नगरकर व मोठ्या संख्येने टपाल कर्मचारी उपस्थित होते. दुपारच्या सत्रात
महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी रक्तदान
शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात आपले दिवसभराचे
कामकाज करत जवळपास तेवीस डाक कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला,
यामध्ये महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला.
यावेळी कमलेश मिरगणे, बापु तांबे, सागर
पंचारिया, तान्हाजी सूर्यवंशी,प्रदिप
सूर्यवंशी,राजेंद्र राहिंज ,शिवाजी
वराडे,नितीन थोरवे,देवेन्द्र शिंदे,शुभांगी शेळके,नाजमीन शेख,हैदरअली
मुलानी, राधाकिसन मोटे, किशोर नेमाने,
संपत घुले, निलिमा कुलकर्णी, स्मिता कुलांगे, शुभांगी मांडगे यांनी विशेष प्रयत्न केले.
कोळगावला 71 फुटी स्वराज्य ध्वजाची उभारणी
श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील युवकांनी एकत्र येत छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने 71 फुटी स्वराज्य ध्वज कोळगाव फाटा येथे उभा केला.
छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य घराघरात पोहोचावे, तरुणाईला या कार्यापासून
प्रेरणा मिळावी, त्यांच्यामध्ये उत्साह जिद्द निर्माण व्हावी
या हेतूने त्यागाचे प्रतीक समजल्या जाणाऱ्या भगव्या रंगाचा 71 फुटी स्वराज्य ध्वज कोळगाव फाटा येथे युवकांनी एकत्र येऊन उभा केला.
यावेळी जय शिवाजी- जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज
यांच्या नावाने प्रचंड घोषणा देण्यात आल्या. आणि डीजेच्या तालावर तरुणाई बेधुंद
होऊन छत्रपतींच्या जयघोषात थिरकू लागली. प्रत्येकाचा ऊर अभिमानाने भरून येत होता.
अशाच प्रकारचा 41 कोटी स्वराज्य ध्वज भापकरवाडी (कोळगाव) येथे भापकर वाडी तरुण मंडळाने उभा
केला. येथील ग्रामस्थांनी एकत्र येऊन शिवजयंतीच्या निमित्ताने हा ध्वज उभा केला. महाराजांचा
भगवा ध्वज मोठ्या डौलाने फडकत होता. कोरोनाचे निर्बंध शिथिल होत असतानाच दोन
वर्षानंतर मोठ्या उत्साहात प्रथमच शिवजयंतीच्या निमित्ताने सर्व आबालवृद्धांमध्ये
व तरुणाईमध्ये मोठा जल्लोष पहावयास मिळत होता.
कार्यक्रमास गावातील आजी-माजी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत
सदस्य, सोसायटीचे सर्व आजी माजी चेअरमन, व्हॉ. चेअरमन, संचालक, गावातील
सर्व पक्षीय नेते ,तरुण मंडळांचे पदाधिकारी, तसेच विविध कार्यकर्ते, शालेय, कॉलेजचे विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या उत्साहाने सामील झाले होते.
चितळेरोड मित्र मंडळाचे धान्यवाटप
चितळेरोड मित्र मंडळाचे शुभम झिंजे यांचे हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतीमेचे पुजन करण्यात आले. तसेच मंडळातर्फे नेहरू मार्केट येथे शहरात आलेल्या कष्टकरी सामान्य जनतेस धान्यवाटप व गोविंद पानसरे लिखित 'शिवाजी कोण होता?' या ग्रंथाचे वाटप करण्यात आले.
यावेळी मंडळचे अध्यक्ष संजय झिंजे, हॉकर्स संघटनेचे शाकीर शेख, . अभिजीत एकनाथ वाघ, सिटूचे कॉ. प्रा. डॉ.
महेबुब सय्यद, इतिहासप्रेमी मंडळाचे असिफखान दुलेखान, रामभाऊ धोत्रे, शरद मडूर,
समृध्दी वाकळे, भैरवनाथ वाकळे, आनंद
प्रेसचे डॉ. सुहास कवडे, सुधीर परदेशी, अजय झिंजे, अनिकेत झिंजे, नितीन
ताठे, शादाब सय्यद, वसंत गुगळे, अरूण खिच्ची, रामान्ना गालपेल्ली, सुनिल नागपुरे,भागचंद कोकाटे,मुन्ना
तांबोळी, राजाभाऊ चौधरी, पिंटू कोंडके,
बाळासाहेब रोकडे, बालाजी गौरी, रत्नाकर कोंडके आदी उपस्थित
होते.
शाळा महाविध्यालयात शिवरायाना अभिवादन
नगर शहरासह जिल्हाभरातील शाळा, महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतीमेचे पुजन करुन अभिवादन करण्यात आले. येथील भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल येथे १८९७ साली छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती उत्सवाला सुरुवात झाली या ठिकाणी आमदार संग्राम जगताप यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
अहमदनगर शहरातील ब्रिटिश काळात उभारलेल्या तत्कालीन
संबोधले जाणाऱ्या शिवाजी मंदिरात सार्वजनिक शिवजयंती महोत्सव स्मायलिंग अस्मिता
कष्टकरी शेतकरी विद्यार्थी संघटनेच्या वतीने साजरा करण्यात आला. यावेळी बाळासाहेब
पवार, विधाते, स्मायलिंग अस्मिताचे कार्याध्यक्ष यशवंत तोडमल, मुन्ना
चमडेवाले, धिरज कुमटकर, भाऊ निकम,
जैद शेख, शहर अभियंता सुरेश इथापे, श्रीकांत निंबाळकर, महादेव कोतकर, अमोल लहारे, राहुल पडोळे पदाधिकारी उपस्थित होते.
नगर शहरातील
माळीवाडा भागात बाळगोपाळानी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्तिची पालखीतून पारंपारिक
संबळ वादयाच्या गजरात काढ्लेली मिरवणूक आकर्षण ठरली.
0 टिप्पण्या