Ticker

6/Breaking/ticker-posts

लतादिदी म्हणजे निसर्गाची अद्भूत देणगी – बबनराव ढाकणे

 


  लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 पाथर्डीस्वरसम्राज्ञी,भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाने कला,संगीत क्षेत्रासह सकल मानव जातीची अतोनात हानी झाली.त्यांचा स्वर जसा मधुर होता त्यापेक्षाही त्यांचा स्वभाव सोज्वळ होता.सात्विकतेच्या प्रतिक म्हणून त्यांचे व्यक्तिमत्व होते.मंगेशकर कुटुंबियांशी माझे व्यक्तीशः जिव्हाळ्याचे संबंध असून लतादीदींना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो.अशा शब्दांत माजी केंद्रीय मंत्री,ज्येष्ठ नेते बबनराव ढाकणे यांनी आदरांजली वाहिली.

     ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर .ढाकणे यांनी त्यांच्या व मंगेशकर कुटुंबियांच्या विषयीच्या आठवणी ताज्या केल्या. 

     ते म्हणाले,सन १९८९ साली विधानसभेचा उपाध्यक्ष असताना त्याचवर्षी महाराष्ट्र विधीमंडळाचा सुवर्णमहोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .या कार्यक्रमासाठी लतादीदी व संपूर्ण मंगेशकर कुटुंबियांना विशेष निमंत्रण देण्यासाठी मी स्वतः त्यांच्या घरी गेलो होतो.लतादीदींच्या आदरातिथ्याने मी व माझी पत्नी कै.सुमन अक्षरशः भारावून गेलो.एवढ्या मोठ्या गायिका असूनही त्यांच्या आचरणात कुठलाही गर्व नव्हता.विधिमंडळाच्या सुवर्णमोहोत्स्वी कार्यक्रमात लतादीदी,हृदयनाथजी,आशा भोसलेंसह संपूर्ण कुटुंब जातीने हजर होते.

 त्यावेळेसचे लतादीदींचे भाषण मला आजही स्मरणात आहे. कला व संगीत विश्वासाठी त्यांचे योगदान अतुलनीय असून यशाच्या अतिउच्च शिखरावर पोहचूनही त्यांनी त्याचा बडेजावपणा कधीही अंगिकारला नाही.२२ भाषांत ५० हजार गाणी गायणे ही साधी गोष्ट नसून लतादीदी या दैवी व निसर्गाची अद्भूत देणगी होत्या आणि असे व्यक्तिमत्व भारतात जन्मले हि देशासाठी असणारी अभिमानाची बाब आहे.लतादीदींना देश कायम स्मरणात ठेवेल असे ढाकणे शेवटी म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या