रस्त्याचे काम सुरू असल्याने गैरसोय टाळावी देवस्थानाचे आवाहान
लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
नगर- नगर जवळील मांजरसुंभा येथील गोरक्षनाथ गडावर जाणारा रस्ता दोन पुलाच्या कामामुळे दि १८ फेबु पर्यत बंद आहे याकाळात पायी अथवा वाहनाने कोणालाही जाता येणार नाही. त्यामुळे राज्यातून येणाऱ्या भाविकांनी व पर्यटकांनी येऊ नये असे आवाहन देवस्थानच्या वतीने अध्यक्ष व कार्यकारी मंडळाने केले आहे
या ठिकाणी रोज पर्यटक व भाविक मोठ्या संख्येने येत असतात त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी कोणी येऊ नये नवनाथ भक्तिसार मध्ये या ठिकाणाचे महत्व सांगितले आहे स्त्री राज्यातून परत येताना मच्छिंद्रनाथानी सोन्याची वीट बरोबर आणली होती ती मांजरसुंभा येथे ठेवली.
ऋषी, मुनी, देव आदिसाठी भंडारा करण्यासाठी ती गोरक्ष नाथानी फेकून दिली तेव्हा मच्छिंद्रनाथाचा राग अनावर होऊन त्यांनी तांडव केले . गुरूला शांत करण्यासाठी संपूर्ण डोंगरच सोन्याचा केला व गुरूची इच्छापूर्ती साठी सर्वाना निमंत्रण देऊनया ठिकाणी संपूर्ण श्रावण महिन्यात महायन्य केला करून अन्नदान केले अशी पौराणिक कथा आहे म्हणून लोक या ठिकाणी लोक १२ महिने दर्शनाला येत असतात .
0 टिप्पण्या