Ticker

6/Breaking/ticker-posts

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याकडून युद्धगर्जना ; शरण येण्याचे केले आवाहन

 







लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

मॉस्को, (रशिया) : युक्रेन आणि रशिया आता प्रत्यक्ष रणांगणात एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. रशियाकडून अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी मिलिटरी ऑपरेशन लॉन्च करण्याची घोषणा करुन युक्रेनला शरणागती पत्करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे आता युक्रेन आणि रशियाचं युद्ध अट्ळ आहे.

रशियाकडून स्पेशल मिलिटरी ऑपरेशन लॉन्च केलं जात असल्याचं पुतीन यांनी म्हटलंय. युक्रेनचं निशस्त्रीकरण' हे पुतीन यांचं ध्येय आहे.  युक्रेनच्या लष्करानं शस्त्रास्त्र टाकून घरी निघून जावं, असं आव्हान देत पुतीन यांनी युक्रेनला शरणागती पत्करण्यास सांगितलंय. युक्रेनवर कब्जा मिळवण्याचा आपला कोणताही हेतू नसल्याचं पुतीन यांनी म्हटलंय.

यापूर्वी, युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी गुरुवारी 'येत्या काही दिवसांत रशिया युरोपमध्ये मोठ्या युद्धाला सुरूवात करू शकतं' अशी शक्यता वर्तवली होती. याच घडामोडींदरम्यान अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी युद्धाच्या भीतीनं रशियाच्या समकक्षासोबतची बैठक रद्द केली. सोबतच, 'रशियाने आधीच केलेल्या अपराधांची किंवा ज्या अपराधांची त्यांची योजना आहे, त्याबद्दल त्यांना दंड देण्यासाठी जगानं आपल्या सर्व आर्थिक सामर्थ्यासहीत प्रत्यूत्तर द्यायला हवं, असं आवाहन ब्लिंकेन यांनी जगाला केलं होतं. दुसरीकडे, संयुक्त राष्ट्राकडून रशियाला हल्ला रोखण्याचं आवाहन करण्यात आलंय.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन गुरुवारी सकाळीच युक्रेनमध्ये विशेष लष्करी कारवाईची घोषणा करत युद्धगर्जना केलीय. सोबतच, रशियन सैन्याकडून युक्रेनमध्ये हल्ल्यांची सुरूवातही झाल्याचं दिसून येतंय. युक्रेनची राजधानी 'कीव' स्फोटांच्या आवाजांनी गोंधळून गेलीय. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याकडून पुतीन यांनी परिणामांना सामोरं जाण्यास तयार राहण्याची धमकी देण्यात आलीय. या युद्धामुळे भयंकर विनाश होईल, असंही बायडेन यांनी म्हटलंय. तर दुसरीकडे, पुतीन यांनी 'युक्रेन-रशिया युद्धात कोणत्याही देशानं घुसण्याचा प्रयत्न केला तर त्याचे भयंकर परिणाम दिसून येतील' अशी धमकी दिलीय. रशिया स्वत:च्या संरक्षणासाठी काहीही करण्यास तयार असल्याचंही पुतीन यांनी स्पष्ट केलंय. यामुळेच, अण्वस्त्रांनी सज्ज रशिया आणि नाटो आता आमनेसामने 

काय म्हटलं पुतीन यांनी ?
गुरुवारी सकाळी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी विशेष लष्करी कारवाईच्या निर्णयाची माहिती देशवासियांना दिली. दूरचित्रवाणीवरून केलेल्या एका भाषणात त्यांनी देशासहीत जगालाही संदेश दिलाय. 'युक्रेनच्या रहिवाशांना नेमकं कुठे राहण्याची इच्छा आहेअसा प्रश्न कधीही विचारण्यात आला नाही. याबद्दल निर्णय घेण्याचा आपल्या सगळ्यांचा अधिकार आहे. आम्ही क्रिमियाच्या नागरिकांचंही संरक्षण केलं आणि आता युक्रेनच्या नागरिकांचंही करणार. आम्ही स्वसंरक्षणार्थ काम करत आहोत. आमच्याविरुद्ध धोकादायक कारवाई सुरु करण्यात आलीय. आपण लवकरच या दुःखद काळातून बाहेर पडू. मात्र या काळात बाहेरच्यांचा हस्तक्षेप आम्ही खपवून घेणार नाही. मी युक्रेनियन लष्कराला सांगू इच्छितो की तुमच्या वडील आणि आजोबांनी आपल्या लढाईत योगदान दिलंय. तुम्हीही शस्त्रास्त्र खाली ठेवा आणि घरी निघून जावं. युक्रेनच्या अशा सर्व सैनिकांना सुरक्षित घरी पोहोचवलं जाईल. युक्रेन सैनिकांनी असं केलं नाही तर त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील आणि याची जबाबदारी 'कीव'वर असेल.

सध्या जे काही घडतंय, त्यात कोणत्याही परकीय देशाचा शिरकाव झाला, तर त्यालाही सडेतोड उत्तर दिलं जाईल आणि त्यानंतर घडेल ते आत्तापर्यंत इतिहासानं पाहिलेलं नसेल. मला आशा आहे की माझा आवाज तुम्हााल ऐकू जाईल.

आमच्या प्रिय रशियन नागरिकांनो, ही वेळ एकत्र उभं ठाकण्याची आहे. लष्कर कारवाईसाठी पुढे जाईल. अमेरिका खोट्यांचं साम्राज्य आहे. त्यांच्याकडे बोथट सैन्य आहे पण मेंदू नाही. पण आमच्याकडे बुद्धी आहे. आम्ही आमच्या सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी लढण्यासाठी तयार आहोत. मला खात्री आहे की, रशियन सैन्य आपलं कार्य व्यावसायिक पद्धतीने पूर्ण करेल. आम्ही सामाजिक सुरक्षा, आर्थिक क्षेत्रांची काळजी घेत आहोत. रशियाचं भविष्य सुरक्षित हातात आहे. जो काही निर्णय घेतला आहे, त्याचं उद्दीष्ट पूर्ण केलं जाईल. मला आशा आहे की तुम्ही माझ्या निर्णयाला पाठिंबा द्याल'



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या