Ticker

6/Breaking/ticker-posts

बनावट इन्शुरन्स पॉलिसी प्रकरणी गुन्हा दाखल

 





लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

नेवासा : ट्रक इन्शुरन्स पॉलिसीचे बनावट कागदपत्रे तयार करून पॉलिसीकरीता रक्कम घेतल्याप्रकरणी खरवंडी येथील रणजीत मच्छिंद्र कुर्हे (रा.खरवंडी ता. नेवासा) याच्यावर फसवणुकीसह वेगवेगळे गुन्हे शिंगणापूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत. 

 याबाबत पोलिस ठाण्याकडून समजलेली माहिती अशी की जयेश रामलाल कर्डिले वय २२ धंदा ट्रान्सपोर्ट (रा. सांगवी म्हाळस पिंपळगाव ता. नेवासा) यांनी १६ डिसेंबर २० रोजी विमा सेवा केंद्र वडाळा बहिरोबा ता नेवासा येथे ट्रक क्रमांक MH20 AT 9550 या वाहनाचा एक वर्षाकरिता इन्शुरन्स पॉलिसी काढली या पॉलिसीचे बनावट कागदपत्र तयार करून ते खरे असल्याचे भासवुन ५४,७२३ रुपये भरून घेतले.

 जयेश कर्डिले यांनी कागदपत्रांची शहानिशा करण्याकरता विचारले असता रणजीत कुर्हेने शिवीगाळ व दमदाटी केली या प्रकरणी रणजीत मच्छिंद्र कुर्हे याच्यावर गुन्हा रजिस्टर नंबर २०/२०२२ भादवि कलम ४२०, ४६५, ४६८, ४७१, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलिस निरीक्षक रामचंद्र कर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर माळवे पुढील तपास करत आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या