लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क
सोनई
: महालक्ष्मीहिवरा ता.नेवासा
शिवारात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीचा ग्रामसुरक्षादल व सोनई
पोलिसांनी डाव उधाळून लावला.काटवनात पाठलाग करुन एका दरोडेखोरास अटक करण्यात आली
आहे.अंधार व काटवनाचा फायदा घेवून चार जण पळून जाण्यात यशस्वी झाले आहे.रात्रभर शोध
घेवूनही आरोपी हाती लागले नाही.
गोपनीय
माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक सचिन बागुल यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक
मनोज पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक स्वाती भोर,शेवगाव विभागाचे पोलिस उपअधीक्षक सुदर्शन मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलिस पथक व ग्रामसुरक्षादलाच्या युवकासह काल मंगळवारी रात्री अकरा वाजता पाठलाग
करुन रोहन यशा भोसले यास अटक केली. गणेश परदेशी, तैनुर आकाश
काळे,
अजय
मिरीलाल काळे, सुंदरसेन
शिवाजी भोसले हे चार जण पळून गेले.
सोनई
पोलिस ठाण्यात दाखल गुन्हातील घरफोडीची
कबुली आरोपीने दिली आहे. शिरुर जि.पुणे येथून चोरलेल्या २ लाख २० हजार रुपये
किंमतीच्या दोन मोटारसायकली ताब्यात घेण्यात आल्या आहेत.पाठलाग करताना तलवार, चाकू,कटावनी,
पान्हा व लोंखडी विळा पोलिसांनी ताब्यात
घेतला आहे. सोनई, शनिशिंगणापुर,
गेवराई, जालना,गंगापुर,
राहाता पोलिस ठाण्यात आरोपीवर गुन्हे दाखल आहेत.
पथकात सहायक पोलिस निरीक्षक सचिन
बागुल,बाबा वाघमोडे,विक्रम मिसाळ,रविंद्र लबडे,दत्तात्रेय गावडे, अमोल जवरे,ज्ञानेश्वर आघाव, विठ्ठल
थोरात,वैभव शित्रे, मृत्युंजय मोरे
सहभागी होते.पळून गेलेल्या चार आरोपीस अटक करण्यासाठी पथक तयार करण्यात आले असुन
शोध सुरु करण्यात आला आहे. भा.द.वी.३९९,४०२ नुसार गुन्हा
दाखल करण्यात आला आहे.
0 टिप्पण्या