लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
पाथर्डी
: उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी सुरू असलेल्या
बैठा सत्याग्रहास माजी उपनगराध्यक्ष दिपाली बंग यांनी महीलासमवेत या आंदोलनाला
पाठिंबा दिला आहे.
त्यांच्या
प्रभागातील विद्या बरबडे, सुनीता
रोडी, दिव्या कलंञी, तारा टिपरे,
शोभा राऊत, शमा
शेख आदीसह महिलानी उपजिल्हा रुग्णालयातील गलथान कारभाराच्या विरोधात शहानवाज शेख,अण्णा हरेर, गणेश सोनट्टके, पांडु
भिसे बैठ्या सत्याग्रहास बसले आहेत,
त्याना पाठिंबा दिला.
यावेळी
बंग म्हणाल्या, गरजवंत
लोकांना या उपजिल्हा रुग्णालयाची उपचारासाठी नितांत गरज असताना या ठिकाणी वेळेवर
औषध मिळत नाही.तज्ञ डॉक्टर नसल्याने अनेक एक साधन सामग्री धूळ खात पडले आहे.
मजुरी करून हातावर पोट भरणाऱ्या लोकांना या उपजिल्हा रुग्णालयचा
फायदा होऊन आर्थिक बचत होते.त्यामुळे प्रशासनाकडून या आंदोलनाची दखल घेऊन आंदोलन
कर त्यांच्या रास्त मागण्या पूर्ण कराव्यात. हे आंदोलन बुधवारपासून सुरू आहे. मात्र
याची साधी दखल वरिष्टानी घेतली नाही याबद्धल
आश्च्रर्य व्यक्त केले जात आहे.
0 टिप्पण्या