Ticker

6/Breaking/ticker-posts

भालगाव गटातील दलित वस्ती सुधार योजनेसाठी एक कोटीं मंजूर-प्रभावती ढाकणे

 






लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

पाथर्डी : (टाकळी मानूर)   जि. प. माध्यमातून भालगाव जिल्हा परिषद गटातील विविध गावांतील दलित वस्ती सुधार योजनेतून अनेक कामांसाठी एक कोटी १ लाख रुपयांचा विकास निधी मंजूर झाल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्या प्रभावती ढाकणे यांनी दिली.

या संदर्भात ढाकणे म्हणाल्या की ,जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत भालगाव जिल्हा परिषद गटातील अकोला येथील दलित वस्तीच्या पाणी पुरवठा योजनेसाठी पाच लाख रुपये तर भालगाव येथील मातंगवस्ती रस्ता काँक्रीटीकरणासाठी १५ लाख रुपये, बौध्दवस्तीच्या रस्ता काँक्रीटीकरणासाठी १५ लाख रुपये तर कासाळवाडी दलितवस्तीच्या  रस्ता काँक्रीटीकरणासाठी ६  लाख त्याचप्रमाणे मिडसांगवी येथील हरिजनवस्तीच्या बंदिस्त गटार कामासाठी १० लाख रुपये, मिडसांगवीतील लिंबठोवस्तीच्या पाणीपुरवठ्यासाठी ८ लाख, भवरवाडी दलितवस्ती रस्ता काँक्रीटीकरणासाठी पाच लाख, मुंगुसवाडे येथील गावठाण दलित वस्तीच्या बंदिस्त गटार कामासाठी १० लाख व नविन दलित वस्तीच्या पाणी पुरवठा योजनेसाठी ८  लाख रुपये, मोहोजदेवढे येथील गावठाण दलित वस्तीच्या पाणीपुरवठा योजनेसाठी १० लाख रुपये व रस्ता काँक्रीटीकरणासाठी ७ लाख रुपये, बंदिस्त गटार कामासाठी ३ लाख , शेकटे येथील हरिजन वस्ती येथील रस्ता काँक्रीटीकरण व बंदिस्त गटार कामासाठी ५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून लवकरच या कामांना प्रत्यक्षात सुरुवात होईल.

 भालगाव जिल्हा परिषद गटात तालुक्यात पाच वर्षात मोठ्या प्रमाणात विकास कामांसाठी निधी मिळवून अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यात आले आहेत. यासाठी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.राजश्री घुले व समाजकल्याण समितीचे सभापती उमेश परहर यांचे विशेष सहकार्य लाभले असल्याचे ढाकणे यानी सांगितले.

 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या