Ticker

6/Breaking/ticker-posts

ऋषिकेश ढाकणे आता थेट ऊसाच्या फडात.. पाचाटात कामगारांबरोबर खाल्ली चटणी-भाकर

 







लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

पाथर्डी : संघर्षयोद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक ऋषिकेश ढाकणे यांनी टाकळीमानूर परिसरातील ऊसाच्या फडात ऊस तोडणी कामगारांची भेट घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तोडणी कामगारांच्या आग्रहावरून ऊसाच्या फडात "चटणी-भाकरीचा" आस्वाद घेतल्याने कामगारही हरखून गेले.

 जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल ऋषिकेश ढाकणे यांचा टाकळीमानूर येथे सत्कार आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमानंतर उपस्थित ग्रामस्थांनी ऊसाच्या संदर्भात अनेक विषय मांडले. टाकळीमानूर परिसरात ऊस उत्पादकांच्या मागणीवरून मागील आठ दिवसांपासून केदारेश्वर कारखान्याने ऊस तोडणीसाठी कामगारांच्या टोळ्या पाचारण केल्याने या परिसरातील ऊस उत्पादकांना मोठा दिलासा मिळत आहे.अशाच एका ऊसाच्या शेतात श्री.ढाकणे यांनी भेट देत ऊस तोडणी कामगारांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व कारखान्याकडून आवश्यक उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.

 यावेळी बोलताना कामगारांनी माजी मंत्री बबनराव ढाकणे यांच्या तोडणी कामगारांच्या संघर्षबाबाबत  उल्लेख करीत, आज ज्या सुविधा व कष्टाचा मोबदला आम्हाला मिळतोय त्याला बबनराव ढाकणे यांचा ऊस तोडणी कामगारांसाठीचा केलेला संघर्ष कारणीभूत असल्याचे निक्षूण सांगितले. ज्या घटकाला कारखानदारांच्या पिळवणुकीतून पोटाची खळगी भरावी लागायची त्याविरोधात बबनरावांनी उभारलेला लढा व आम्हाला न्याय व सन्मान मिळवून दिल्याबद्दल कामगारांनी ऋषिकेश ढाकणे यांच्याकडे कृतज्ञतापूर्वक सांगितले. ऋषिकेश ढाकणे यांनी कोयता हातात घेत ऊसही तोडला व कामगारांच्या आग्रहावरून ऊसाच्या फडातच बसकण मांडत कामगारांसोबत चटणी-भाकरीचा आस्वाद घेतला. त्यामुळे ऋषिकेशमध्ये त्यांचे आजोबा ज्येष्ठ नेते बबनराव ढाकणेंच्या साधेपणाची झलक दिसून आली.

यावेळी बोलताना ऋषिकेश ढाकणे म्हणाले,केदारेश्वर कारखाना ऊस तोडणी कामगारांच्याच मालकीचा असून यंदापासून कारखान्याची गाळप क्षमता वाढविल्याने फारशा गळीताच्या अडचणी येत नाहीत.कारखाना कार्यक्षेत्र व बाहेरील असे मिळून जवळपास सहा लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट बाळगून असून शेतकी विभागाने व्यवस्थित नियोजन केल्याने नोंदीनुसार ऊस तोडणी सुरु आहे.यावेळी राजेंद्र नागरे,दादासाहेब बारगजे आदी हजर होते.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या