Ticker

6/Breaking/ticker-posts

पाथर्डीत बजरंग दल कार्यकर्त्यांच्या हत्येचा हिंदुत्ववादी संघटनातर्फे निषेध

 






लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क

 

पाथर्डी : कर्नाटकातील शिवमोगा येथील बजरंग दलाचे निष्ठावंत कार्यकर्ता हर्षा यांची हत्या करण्यात आली. या घटनेचा विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व इतर सर्व हिंदुत्ववादी संघटना तर्फे निषेध व्यक्त करण्यातं आला. 


हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर होणारे हल्ले बंद व्हावेत. दोषींवर कठोर कारवाई करुन फाशीची शिक्षा द्यावी. अशा या भ्याड व निंदनीय कृत्याचा व अमानुष हत्येचा हिंदू बांधव तिव्र निषेध करतो. दोषींवर कठोर शिक्षेची कार्यवाही न झाल्यास विश्व हिंदू परिषद तीव्र आंदोलन करेल, असा इशारा यावेळी विहींपचे महादेव सोनवणे यांनी दिला आहे.

 

इस्लामिक कट्टरपंथीय कोणतेही कारण पुढे करत या देशात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. रक्तपात घडवून आणत भ्याड हल्ले करुन हिंदु तरूणांची हत्या करतात येथुन पुढील काळात असे हल्ले, हत्या होऊ नये. यासाठी सरकारने योग्य ती खबरदारी घ्यावी अन्यथा हिंदू समाजाच्या असंतोषाला सरकार जबाबदार असेल अशा भावना यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.  यावेळी तहसीलदार शाम वाडकर यांना निवेदन देण्यात आले. या वेळी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, गोरक्षण समीती, शिवसेना, हिंदु राष्ट्र सेना, हिंदू रक्षा युवा मंच आदी संघटनांचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या