लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
नगर
शहराजवळील बेल्हेश्वर, डोंगरगण येथील रामेश्वर,
पाथडी तालुक्यातील व्रुद्धेश्वर, नेवासा तालुक्यातील
प्रवरासंगम येथील सिद्धेश्वर आदी मंदिरावार सजावट करण्यात आली असून अभिषेक,पूजा व महाआरती,
नंतर भजने, किर्तन
सकाळी भाविकांच्या वतीने दूध, केळी,फळे,लाडू,साबुदाणा खिचडीचा फराळ- महाप्रसाद भाविक
भक्तांना दिवसभर वाटप करण्यात येणार आहे.
गोरक्षनाथ गडावर महाशिवरात्री
दरवर्षी मोठ्या उत्सहात होणारी महाशिवरात्री
यात्रा उत्सव नगरजवळील
मांजरसुंभा येथील गोरक्षनाथ गडावर दि.१ मार्च २०२२.मंगळवार रोजी आयोजित करण्यात
आला आहे यानिम्मिताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे गोरक्षनाथ गडावर
महाशिवरात्रीला रात्री १२ वा पासून उत्सव सुरु होतो ,हजारो
वर्षाची हि परंपरा आहे नवनाथ भक्तिसार मध्ये या
ठिकाणाचे महत्व सांगितले आहे
आदल्या दिवशी वांबोरी,कात्रड,मांजरसुंभा,पाची महादेव वस्ती या ठिकाणचे हजारो युवक
प्रावरसंगमाला जातात व कावडीने पायी गंगाजल आणतात रात्री १२ ते पहाटे ६ वाजेपर्यत
गडावर येऊन देवाला गंगाजल अर्पण करतात रात्रीच्या अंधारात गर्भगिरी डोंगरात
यावेळेस ओम शिव गोरक्ष,हर हर महादेव चा जयघोषने परिसर दुमदुमून
जातो
स.७ वा.श्री अभिषेक,पूजा
व महाआरती, नंतर भजने,किर्तन नाथभक्त म्हणतात सकाळी ५ वाजल्यापासून भाविकांच्या वतीने दूध,
केळी,फळे,लाडू,साबुदाणा खिचडीचा फराळ- महाप्रसाद भाविक भक्तांना दिवसभर वाटप केला जातो. गेली २ वर्ष कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे यात्रा उत्सव श्री गोरक्षनाथ गडावर झाला नाही, यावर्षी मोठ्या संख्नेने भाविक येण्याचा अंदाज आहे त्यादृष्टीने नियोजन
करण्यात आले आहे .
यात्रेनिमित्त
हजारो भाविक रात्री उशिरापर्यंत दर्शनाला गर्दी करत असतात तर दिवसभर दर्शनासाठी
रांगा लागतात तसेच मांजरसुंभा फाटा ते गडापर्यंत अनेक दुकानदार दुकाने लावतात भाविकांना विनंती आहे यावर्षी महाशिवरात्रीला दर्शनाला
कोरोनाचे सर्व नियम पाळून यावे भांडारा ,
महाप्रसाद करणार्यांनी सुरक्षित
अंतर राहील याची काळजी घ्यावी असे आवाहन देवस्थानच्या
वतीने अध्यक्ष ऍड शंकरराव कदम व कार्यकारी मंडळाने
केले आहे
0 टिप्पण्या