लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
आमदार राजळे यांनी पाथर्डी पोलिस ठाण्यात जाऊन निवेदन देऊन शहर व तालुक्यातील वाढती गुन्हेगारी,कायदा सुव्यवस्था, अवैध धंदे याबाबत माहिती घेऊन पोलिसांना जाब विचारत व कामकाजाबाबत नाराजी व्यक्त करून तत्काळ सुधारणा करण्यास सांगितले. यावेळी सभापती सुनिता दौंड, भाजपाचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, माहिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा काशीबाई गोल्हार, शहराध्यक्ष अजय भंडारी, नगराध्यक्ष डॉ.मृत्युंजय गर्जे, उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष सचिन वायकर, पंचायत समीती सदस्य विष्णुपंत अकोलकर, सुनिल ओव्हळ, सुभाष केकाण, नगरसेवक प्रवीण राजगुरू, रमेश गोरे, बजरंग घोडके, रमेश हंडाळ, बबन बुचकुल, 'मंगल कोकाटे, खरवंडी कासारचे सरपंच प्रदिप अंदुरे, संदीप पठाडे, सिंधुताई साठे, ज्योती मंत्री, मनिषा घुले, अॅड. प्रतिक खेडकर, नवनाथ नरोटे, जमीर आतार, नारायण पालवे, आदिनाथ धायतडक, नवनाथ धायतडक, गोरक्षनाथ धायतडक, महेश अंगारखे, संदिप पवार, माणिक अंदुरे, भगवान साठे, अॅड.संपत गर्जे, काकासाहेब शिंदे, उत्तम गर्जे, पांडुरंग सोनटक्के, राजेंद्र दगडखैर, अक्षय काळे, अशोक मंत्री, युसुफ शेख, बाळासाहेब गोल्हार, , भाऊसाहेब सांगळे यांच्यासह भाजपाच्या कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्यात जाऊन सहाय्यक पोलिस निरीक्षक रामेश्वर कायंदे यांची भेट घेतली.
शहरातील
सध्याच्या चोरी प्रकरणाने जनता त्रस्त झाली आहे.ग्रामिण भागात दिवसा चो-या होत
आहेत.लाखो रुपयाची लुट होते.तपास लागत नाही.पोलिसांच्या बद्दल सामान्य माणसाच्या
मनातला विश्वास डळमळीत झाला आहे. लोकभावना तीव्र आहेत.भरदिवसा महीलांचे दागिने
लुटले जात आहेत.मोबाईल व दुचाकीच्या चो-या दररोज होत आहेत.बाजारात खिसे कापले
जातात. दारु,मटका,मावा व झुगारासह अवैध व्यवसाय तेजीत आहेत.त्यामुळे सामान्य माणसाला त्रास
होतो. तातडीने उपाययोजना करा अन्यथा तीव्र स्वरूपाचे अंदोलन करण्याचा इशारा आमदार
राजळे यांनी दिला आहे.
0 टिप्पण्या