लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
मुंबई- भारतरत्न, स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे रविवार, ६ फेब्रुवारी रोजी सकाळी
त्यांचे निधन झाले. दीदी यांना त्यांचे
चाहते 'सूरांची सरस्वती' असेही
म्हणायचे. लताजींनी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. भारताची गान्
कोकिळा म्हणून जगभरात प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांनी १९४२ मध्ये वयाच्या
अवघ्या १३ व्या वर्षी गायनाची सुरुवात केली होती.
२८ सप्टेंबर १९२९ रोजी मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये जन्मलेल्या लता दीदींची
पहिली कमाई २५ रुपये होती. ही कमाई त्यांना स्टेजवर गाण्यासाठी मिळाली होती. लता
मंगेशकर यांनी जगातील ३६ भाषांमध्ये ३० हजारांहून अधिक गाणी गायली आहेत. लता
मंगेशकर यांची एकूण संपत्ती सुमारे ५० दशलक्ष यूएस डॉलर्स आहे. भारतीय चलनानुसार
सुमारे ३७० कोटी रुपये. लता मंगेशकर यांची बहुतांश कमाई ही त्यांच्या गाण्यांवरील
रॉयल्टी आणि त्यांच्या गुंतवणुकीतून आली आहे.
गाड्यांची होती प्रचंड आवड
त्यांनी फार पूर्वी एका मुलाखतीत सांगितले होते की, त्यांना गाड्यांची खूप आवड आहे. लता
मंगेशकर यांच्याकडे गाड्यांचा आणी भारीतल्या साडयांचा मोठा संग्रह होता. लता
दीदींनी पहिल्यांदा Chevrolet खरेदी केली होती. त्यांनी ते आपल्या आईच्या नावाने विकत घेतली होती.
यानंतर त्यांच्या गॅरेजमध्ये एक Buick गाडी आली. त्याच्याकडे
Chrysler कारही होती. इतकंच नाही तर यश चोप्रा यांनी लता
दीदींना 'वीरझारा' च्या म्युझिक
रिलीजच्या वेळी एक मर्सिडीज कार भेट दिली होती, असे लता
मंगेशकर यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते.
0 टिप्पण्या