खरवंडी कासार सेवा सोसायटीच्या नवीन इमारतीचे लोकार्पण
लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
खरवंडी कासार (ता. पाथर्डी) : कर्ज थकबाकी ठेवणाराना कर्ज माफी, मात्र नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्याना काहीच नाही. राज्याचे मुख्यमंत्री फक्त घोषणा करता अमंलबजावणी मात्र होत नाही. आता केंद्र सरकारने सहकार मंत्रालय चालु केल्याने सहकाराला संजीवनी मिळ्णार असुन अधिक बळकट होणार आहे, असे प्रतिपादन आमदार मोनीका राजळे यांनी केले.
खरवंडी
कासार येथिल विविध कार्यकारी सेवा सोसायटी च्या नवीन इमारतीचे आमदार राजळे यांच्या
हस्ते उदघाटन झाले त्याप्रसंगी अध्यक्षस्थाणावरून त्या बोलत होत्या. या वेळी
सहायक निबंधक भारती काटुळे, तालुका विकास अधिकारी सुभाषराव
वाढेकर, सभापती सुनिता दौंड ,भाजपा
तालुकाध्यक्ष माणीकराव खेडकर, भाजपा तालुका महिला आघाडी
तालुकाध्यक्षा काशीबाई गोल्हार, बापुराव पठाडे दत्तात्रय
पठाडे, महादेव जायभाये, अकुंश कासुळे, एकनाथ आटकर, रशीद तांबोळी , गहिनाथ
ढाकणे ,खरवंडीचे सरपंच प्रदीप पाटील,
नितीन किर्तने ,जगनाथ खेडकर आदी उपस्थित होते .
पुढे बोलतांना आ.राजळे म्हणाल्या अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे राज्यात चांगले नाव व ओळख असुन. जेष्ठ नेते भाऊसाहेब थोरात, मारुतराव घुले, शंकरराव काळे ,यशवंतराव गडाख, शंकरराव कोल्हे आदींनी पारदर्शक कारभार करून बँकेचा राज्यभर लौकीक वाढविला आहे. त्यामुळे ही बँक शेतकऱ्यांची बँक म्हणुन ओळखली जाते.
बँकेच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी शेतकरी, खातेदाराना वेळेवर व
चांगली सेवा द्यावी. तालुक्यातील सर्वच सेवा संस्था राजकारण विरहीत काम चांगले करत
असुन सधन तालुक्यापेक्षा वसुलीसुद्धा चांगली आहे.
राज्य शासनाची
कर्जमाफी योजना फसवी असुन अनेक पात्र शेतकरी वंचित राहिले आहेत. बँकेच्या संचालक
मंडळ बैठकीत यावर चर्चा होऊन सरकारकडे पाठपुरावा चालु आहे. सरकारने नियमीत कर्ज
भरणाऱ्या शेतकऱ्यांना घोषणा करून अद्यापही अनुदान दिले नाही, यासाठी आमचा
पाठपुरावा सुरू आहे .
यावेळी
नारायण पालवे,
सोसायटीचे सचीव नागनाथ लोधे, सखाराम खेडकर ,दिपक पाटील, लक्ष्मण अंदुरे,
मुरलीधर अंदुरे, बाबुराव ढाकणे, मोहन
ढाकणे ,योगेश अंदुरे ,रामभाऊ गर्जे
उपस्थित होते. सुत्रसचांलन वृध्देश्वरचे सचांलक बाळासाहेब गोल्हार यांनी केले, प्रस्ताविक सेवा सस्थेचे चेअरमन वामण किर्तने यांनी केले तर आभार सोमनाथ
अंदुरे यांनी मानले.
0 टिप्पण्या