Ticker

6/Breaking/ticker-posts

गान कोकिळा 'भारतरत्न' लता मंगेशकर यांचे निधन

 अनेक मान्यवरांची आदरांजली ; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचे सरकारचे आदेश



लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

मुंबई: 'भारतरत्न' लता मंगेशकर यांच्या निधनानं संपूर्ण देश शोकाकुल आहे. सर्वच क्षेत्रांतून मान्यवर लतादीदींनी श्रद्धांजली वाहत आहेत. त्यांच्याविषयी भावना व्यक्त करत आहेत. राज्याचे मुख्यमत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लतादीदींनी आदरांजली वाहिली आहे. 'लतादीदी हे जागतिक संगीत विश्वाला पडलेलं अद्भूत स्वप्न होतं. ते स्वप्न आज भंगलं आहे. संगीत विश्वातला स्वर्गीय सूर हरपला आहे,' अशा भावना व्यक्त केल्या आहेत.

'दीदींच्या सुरेल सुरांनी रसिकांचं भावविश्व आणि देशाचं कलाक्षेत्र समृद्ध केलं. त्यांच्या जाण्यानं प्रत्येक घर शोकाकुल आहे. स्वर्गीय आनंद देणारी त्यांची गाणी, त्यांचे दैवी सूर हे आकाशात सूर्य-चंद्र असेपर्यंत राहतील, परंतु लतादिदी आपल्यात नसतील, ही कल्पना सहन होत नाही. लतादीदी अमर आहेत. त्यांना श्रद्धांजली वाहण्याची वेळ कधीच येणार नाही हा भाबडा समज आज खोटा ठरला आहे, ' असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

'लतादीदी एकमेव होत्या. त्यांच्यासारखी गानकोकिळा पुन्हा होणे नाही...'अशा शोकभावना मुख्यमत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केल्या आहेत. 


'

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या