छत्रपती संभाजी राजेंच्या मराठा आरक्षण आंदोलनातील भाषणाचे राज्यभरात कौतुक
लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
मराठा
समाजाला आरक्षण मिळावं, यासह
समाजाच्या विविध मागण्यांसाठी खासदार संभाजीराजे छत्रपती हे शनिवार (दि.२६) पासून
मुंबईच्या आझाद मैदानात आमरण उपोषणाला बसले आहेत. रविवारी त्यांच्या आंदोलनाचा
दुसरा दिवस होता. आझाद मैदानावर राज्यभरातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते देखील
आलेले होते.
या
आंदोलन स्थळी छावा संघटना महाराष्ट्र राज्यचे धनंजय जाधव व राज्य संपर्क प्रमुख
सुमित दरंदले यांनी नगरची बालशिवव्याख्याती प्रणाली बाबासाहेब कडूस हिला शनिवारी
(दि.२६) दुपारीच आमंत्रित केले होते.त्यानुसार प्रणाली ही तिच्या आई वडिलांसमवेत
रात्री उशिरा मुंबईत दाखल झाली. रविवारी (दि.२७) सकाळी आझाद मैदानात राज्यभरातून
आलेल्या जनसमुदायासमोर बोलण्यासाठी तिला पाचारण करण्यात आले. तिने तब्बल २२ मिनिटे
अतिशय जोशपूर्ण भाषण करत आरक्षण नसल्याने गोर गरीब मराठा समाजावर होणाऱ्या
अन्यायाला वाचा फोडली. तिच्या भाषणाने उपस्थित जनसमुदाय मंत्रमुग्ध झाला. त्यांनी
टाळ्यांच्या कडकडाटात तिला दाद दिली. यावेळी छत्रपती संभाजी राजे यांनी तिचे
तोंडभरून कौतुक केले. श्रीमंत युवराज्ञी संयोगीताराजे छत्रपती यांच्या कडूनही
प्रणालीचे विशेष कौतुक करण्यात आले. तसेच रायगडावर आयोजित होणाऱ्या कार्यक्रमासाठी
तीला निमंत्रित करण्यात आले.
0 टिप्पण्या