लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
पारनेर
: पारनेर तालुक्यातील खडकवाडी
कामटवाडी रस्त्यालगत पारनेर पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये अवैधरित्या बेकायदा
वाळू चोरी करताना एका चारचाकी वाहनांवर कारवाई करून दोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे याप्रकरणी एका आरोपीस अटक करण्यात आली आहे.
याबाबत
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिस निरीक्षक घनश्याम बळप यांना गुप्त
बातमीदारा मार्फत खडकवाडी ते काममटावाडी रस्त्यावर एक मालवाहतूक गाडी (क्र.एम एच १६
सीसी ६२९१) जितो
गाडीतून अवैधरित्या बेकायदा वाळूची चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली
त्यानंतर पोलिसांनी सापळा रचना त्यामध्ये खडकवाडी येथून एक पिवळ्या रंगाचा जीतो
छोटा हत्ती येताना दिसला या वाहनावरील चालकास चौकशी केली गाडीच्या हवद्या ला
ताडपत्री लावलेली दिसून आली व गाडीमध्ये वाळू आढळून आली.
याप्रकरणी पारनेर पोलीस स्टेशन मध्ये हेड कॉन्स्टेबल
सत्यजित सोनाजी शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी भाऊसाहेब मनोहर हारदे वय 49 राहणार हारदे वस्ती मांडवे
खुर्द ता पारनेर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या पथकामध्ये पोलीस
कॉन्स्टेबल जालिंदर लोंढे पोलीस नाईक भालचंद्र दिवटे सत्यजित शिंदे सागर तोरडमल
यांचा समावेश होता.
0 टिप्पण्या