लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
मढी: मढी देवस्थान समितीमध्ये कोणत्याही प्रकारचे मतभेद नाहीत. मढी देवस्थान विश्वस्त मंडळ व मढी ग्रामस्थानी मुंबई विधी व न्याय राज्यमंत्री आदिती तटकरे यांची भेट घेऊन विविध विकास कामे व भविष्यकालीन उपक्रमाची माहिती दिली. ग्रामपंचायत व देवस्थान समितीच्या पुढाकाराने भाविकांसाठी झालेली विकास कामे पाहण्यासाठी ना.तटकरे लवकरच मढी देवस्थानला भेट देणार आहेत, अशी माहिती देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा सरपंच संजय मरकड यांनी दिली .
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष मरकड ,देवस्थानचे अध्यक्ष तथा सरपंच संजय मरकड , उपअध्यक्ष सचिन गवारे यासह कार्यकर्ते उपस्थित होते . याबाबत मरकड म्हणाले कि, प्रथमच गावाचा देवस्थान समितीचा कारभार समविचारी कार्यकर्त्यांच्या हाती एकवटले असून सत्ता व पदापासून दूर राहावे लागल्याने पोटशूळ उठला आहे. देवस्थानचे माजी पदाधिकारी व कार्यकर्ते देवस्थान बाबत शासन व अधिकाऱ्यांची दिशाभूल करीत आहेत.
देवस्थान समितीचा कारभार पूर्णपणे पारदर्शकता असून यापूर्वी पदे भूषविलेल्या पदाधिकाऱ्यानी आपला कारभार डोळे उघडे ठेवून तपासावा. यापूर्वीची कारभारातील घाण साफ सफाई करून आत्ताच नव्याने घडी बसून झाली. विकास कामे गावासह तालुक्याच्या वैभवात भर घालणारे ठरत आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक येथे येतात विकास कामे पाहून तोंड भरून कौतुक करतात. आमच्यासह मागील पाच वर्षातील विश्वस्त मंडळाची सीबीआय मार्फत चौकशी करावीअशी मागणीही मरकड यानी केली आहे.
0 टिप्पण्या