लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
टाकळीमानुर: राज्य शासनाच्या डोंगरी विभाग विकास योजनेतून तालुक्यातील दोन गावांतील रस्ते विकास कामासाठी ४१ लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रतापराव ढाकणे यांनी दिली.
यासंदर्भात अधिक माहिती देताना ढाकणे म्हणाले,राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार ग्रामीण भागाच्या विकासासाठी सर्वात जास्त निधीची तरतूद करत आहे. ग्रामीण भागातील शेवटच्या घटकांपर्यंत नागरी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी देत असून पाथर्डी तालुक्यातील दुर्गम भागातील रस्त्यांसाठी आपण जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे डोंगरी विभाग विकास कार्यक्रमातून रस्त्यांच्या कामांसाठी सातत्याने पाठपुरावा करुन निधीची मागणी केली होती.
त्यानुसार तालुक्यातील करोडी येथील भाबड वस्ती ते डोंगर रस्ता मजबुतीकरण तसेच बिरोबावस्ती ते वडखोरी रस्ता मजबुतीकरण,तारकेश्वर रस्ता मजबुतीकरण व मोहरी येथील बनवस्ती रस्ता मजबुतीकरण व रानमळा रस्ता मजबुतीकरण या कामांसाठी ४१ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून जिल्हा नियोजविभागाकडून या कामांची प्रशासकीय मान्यता देखील जारी करण्यात आली आहे.
लवकरच या रस्ता कामांना सुरुवातही होईल .डोंगरी विकास योजनेतून माणिकदौंडी व परिसरातील तसेच,चिंचपूर पांगुळ,चिंचपूर इजदे परिसरातील काही गावे यात समाविष्ट होण्यासाठी पात्र करण्याचे तसेच शेवगाव तालुक्यातील कोनोशी,नागलवाडी ,राणेगाव ,गोळेगाव ,शिंगोरी,थाटेवाडगाव व शेकटे या गावातील विविध विकास कामांसाठीचे प्रस्ताव पालकमंत्री मुश्रीफ यांच्याकडे दिलेले असून नविन आर्थिक वर्षात यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिल्याचे .ढाकणे यांनी सांगितले.
0 टिप्पण्या