Ticker

6/Breaking/ticker-posts

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचा प्रश्न मार्गी न लागल्यास शहर बंदची हाक

 






लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

अहमदनगर: मार्केटयार्ड येथील राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या ठिकाणी असलेले अतिक्रमण हटवून पुर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा संघर्ष समितीच्या माध्यमातून फुले, शाहू, आंबेडकरी विचारांना मानणारे समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने बैठा सत्याग्रह करण्यात आला होता.

या आंदोलनाची दखल घेत आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली अहमदनगर महानगर पालिकेमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा संघर्ष समिती व महापालिकेची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये पुतळ्याच्या जागेची मोजणी करून घेऊ व आर्किटेक नेमून डिझाईन तयार करून ती डिझाइन पालिकेत उपलब्ध करण्यात येईल तसेच ३ मार्चला न्यायालयीन प्रक्रियेची सुनावणी झाल्यावर माहिती घेणार असल्याचे बैठकीत सांगितले.

 यावेळी बैठकीत आयुक्त शंकर गोरे, महापौर रोहिणीताई शेंडगे, उपमहापौर यशवंत डांगे, शहर अभियंता सुरेश इथापे, महिला बालकल्याण समितीचे सभापती पुष्पाताई बोरुडे आदीसह. नगरसेवक व डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा संघर्ष समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.    तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा संघर्ष समितीच्या वतीने हा प्रश्न तातडीने मार्गी लागला नाही. तर अहमदनगर शहर बंदची हाक  समितीच्या वतीने देण्या आली. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या