Ticker

6/Breaking/ticker-posts

23 व २४ रोजीच्या लाक्षणिक संपात ग्रामसेवक सहभागी होणार : राज्याध्यक्ष एकनाथ ढाकणे

 













नगर : राज्यातील कर्मचारी वर्गाच्या प्रलंबित मागण्या मंजुर होण्यासाठी राज्य सरकारी, निमसरकारी, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाने दि.२३ व २४ फेब्रुवारी रोजी दोन दिवसीय लाक्षणिक संपाची हाक दिली आहे. या संपात  राज्यातील ग्रामसेवक सहभागी होणार असल्याची माहिती  राज्य अध्यक्ष एकनाथ ढाकणे व सरचिटणीस प्रशांत जामोदे यांनी दिली.


याबाबत दिलेल्या निवेदनात  ढाकणे यांनी म्हटले आहे की, राज्यभर ग्रामसेवक संवर्गाचे २२ हजार ३८८ सभासद कार्यरत आहेत. ग्रामीण भागात अतिशय प्रतिकूल परिस्थितीत ग्रामसेवक काम करीत असतात. शासनाचे कल्याणकारी उपक्रम यशस्वीरित्या कार्यान्वीत करण्यात ग्रामसेवक महत्त्वाची भूमिका बजावत असतात. तरीही या संवर्गाचे अनेक प्रश्न शासन दरबारी प्रलंबित आहेत. त्यामुळे राज्यव्यापी लाक्षणिक संपात ग्रामसेवक संघटना डीएनई १३६ सहभागी होणार  आहे.  नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना पात्र ग्रामसेवकांना लागू करावी, ग्रामसेवक व ग्राम विकास अधिकारी ही दोन्ही पदे रद्द करून पंचायत विकास अधिकारी हे पद निर्माण करावे, ग्रामसेवक शैक्षणिक अर्हता पदवीधर करावी, मनरेगा करिता स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वीत करावी, 


तसेच कोविड १९ महामारी काळात कर्तव्य बजावताना मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना तातडीने 50 लाखांची रक्कम मिळावी, कंत्राटी व योजना कामगारांचा सेवा नियमित कराव्यात, बक्षीस समितीचा अहवालाचा खंड २ प्रसिध्द करावा, सर्व रिक्त पदे तातडीने भरावीत, अनुकंपात तत्वावरील नियुक्त्या विनाशर्त कराव्यात, ग्रामसेवक, नर्सेस, आरोग्य कर्मचार्‍यांच्या तसेच चतुर्थश्रेणी कर्मचार्‍यांच्या प्रलंबित मागण्या मंजूर कराव्यात, निवृत्तीचे वय ६० वर्षे करावे, ग्रामसेवक संवर्गास वैद्यकीय कॅशलेस सुविधा उपलब्ध करून द्यावी, महिला कर्मचार्‍यांना केंद्र सरकारप्रमाणे बालसंगोपन रजा मंजूर करण्यात यावी, कर्मचारी ग्रामसेवक, शिक्षकांना पितृत्त्व रजा मंजूर करावी, तक्रार निवारण सभा दर तिमाही एकदा घेण्यात यावी, ग्रामसभा मुख्यालयाबाबतचा बंधनकारक ठराव रद्द करण्यात यावा व पूर्वीप्रमाणे कार्यवाही चालू ठेवावी आदी मागण्यांसाठी ग्रामसेवक या लाक्षणिक संपात सहभागी होणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या