Ticker

6/Breaking/ticker-posts

गुरुवारी भाजपची बैठक

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

नगर : गुरुवार 3 फेब्रुवारी 2022 रोजी भैया गंधे, शहर जिल्हा अध्यक्ष यांचे कार्यालय गुलमोहर रोड, येथे दुपारी १ वा. जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करणयात आली आहे .या बैठकीला प्रमुख मार्गदर्शन रविजी अनासपुरे संघटन मंत्री उत्तर महाराष्ट्र व मा.मंत्री राम शिंदे ( प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र ) हे करणार आहेत . या बैठकीला उपस्थित खासदार सुजय विखे पाटील ,माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले साहेब , मा.मंत्री बबनराव पाचपुते ,.आ.मोनिकताई राजळे, मा.आ.चंद्रशेखर कदम , प्रदेश सदस्य भानुदास बेरड या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली बैठक होणार आहे .

 

यावेळी मायक्रो डोनेशन, 1 बूथ 30 युथ,  बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान, मन की बात, सुदृढ बालक स्पर्धा, आगामी येणाऱ्या नगरपालिका , जिल्हा परिषद , पंचायत समिती निवडणुकी बाबत चर्चा करणे,  मोर्चे व आघाडया याबाबत चर्चा होणार आहे.

 

वरील सर्व विषयास अनुसरून भारतीय जनता पार्टी जिल्ह्यातील सर्व जिल्हा कार्यकारणी , जिल्हा मोर्चे व आघाडी प्रमुख व सहप्रमुख , तसेच तालुका अध्यक्ष व सरचिटणीस , जिल्हा व मंडळ बूथ संयोजक , तालुका प्रभारी , तालुका मोर्चे आघाडी प्रमुख आपण सगळ्यांनी बैठकीस आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या