Ticker

6/Breaking/ticker-posts

जिल्हाधिकारी यांचे आदेश धाब्यावर..शहर टाकळीतील आठवडे बाजार हाऊसफुल्ल !

 









लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

शेवगाव: कोरोना  संसर्गाच्या पार्श्वभूमीवर  बाजार बंदचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांचे आदेश धाब्यावर  बसवून  तालुक्यातील शहर टाकळी येथील आज  (दि. 10 जानेवारी) रोजी बाजार  भरविण्यात आला  असून तोबा  गर्दी झाली आहे. 


 शेवगाव तालुक्यातील शहर टाकळी ग्रामपंचायत हद्दीत आठवड्यातून एकदा प्रत्येक  सोमवारी आठवडे  बाजार  भरविला  जातो. या  बाजारासाठी पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने  बाजारहाट करण्यासाठी येत  असतात.  सध्या कोरोनाचा फैलाव  राज्यासह नगर जिल्ह्यातही वेगाने होत आहे. या  आठवड्यात आत्तापर्यंत रुग्ण संख्या  1000 वर  पोहोचली  आहे.  


वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी  डॉ. भोसले  यांनी शाळा महाविद्यालये  देखील  बंद  ठेवण्याचे  आदेश  जारी  केले  आहेत. तसेच  गर्दी होणारे  सर्व  कार्यक्रम नियंत्रित करण्याचे आदेश दिले. त्यात  आठवडे  बाजार सुद्धा येतात. तरीही  त्याकडे कानाडोळा  करून  आठवडे बाजार सुरु आहेत. याचे गांभीर्य ग्रामस्थांना व ग्रामपंचायतीला नाही. याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या