लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
बीड : अंबाजोगाई – लातूर महामार्गावर बर्दापूरजवळ नंदगोपाल डेअरी समोर आज रविवार दि.९ जानेवारी रोजी सकाळी ८.३० वाजता लातूर – औरंगाबाद बस व ट्रकची समोरासमोर भीषण टक्कर झाली. या अपघतात ६ जण जागीच ठार झाले तर ११ जण गंभीर जखमी झाले.
अपघात एवढा जबरदस्त होता की, ट्रकच्या अक्षरशः चक्काचुर झाला होता व एसटी बस समोरच्या बाजूने आर्धी फाटली होती. त्यामुळे दोन्ही गाड्या क्रेनच्या साह्याने बाजूला करून जखमींना बाहेर काढावे लागले.
जखमींवर बर्दापूर व अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून मदत कार्य सुरू आहे. किरकोळ जखमिंची संख्या २० वर आहे.राज्यातील नवीन वर्षातील हा मोठा अपघात आहे.
0 टिप्पण्या